पुणे जिल्ह्यातील मुखई (ता. शिरूर) येथील तरुण अभियंता दीपक हिरवे यांनी सोळा एकर सुरू उसाला सबसरफेस या आधुनिक ठिबक सिंचन प्रणालीचा अवलंब केला. शिक्षणाचा पुरेपूर वापर करत ऊस शेतीचे व त्यातही पाणी व खतांचे सुयोग्य व्यवस्थापन करीत एकरी एकशे पाच टन उत्पादन त्यांनी घेतले आहे. अमोल बिरारी दीपक हिरवे (बीई- सिव्हिल) यांनी सुरवातीला काही दिवस पुण्यात नोकरी केली. परंतु शेतीची मनापासून आवड असल्याने 2003 पासून पूर्णवेळ शेतीच करण्याचा निर्णय घेतला. त्यांचे एकूण 23 एकर क्षेत्र आहे. घेतलेल्या शिक्षणाचा पुरेपूर वापर शेतीत करत त्यांनी ऊस शेतीचे केलेले व्यवस्थापन वाखाणण्याजोगे आहे. दररोज ठिकठिकाणचे शेतकरी त्यांच्या शेतीला भेट देण्यासाठी येतात. संरक्षित पाण्याची सोय म्हणून 75 लाख लिटरचे शेततळे त्यांनी केले आहे. कमी पाण्यात अधिक उत्पादन घेता येते, त्यासाठी पिकाला लागतं तेवढंच पाणी दिलं पाहिजे, असं हिरवे म्हणतात. त्यांच्याकडे पावणेचार एकरात निडवा होता, त्याचेही प्रति एकरी 85 टन उत्पादन त्यांनी घेतले आहे.
लागवडीचे नियोजन - हिरवे यांनी गेल्या वर्षी तीन व 12 फेब्रुवारी आणि 28 मार्च रोजी सुरू उसाची फिनोलेक्स कंपनीच्या सबसरफेस ठिबक तंत्रज्ञानाने लागवड केली. लागवडीसाठी जोडओळ पट्टा पद्धतीचा अवलंब केला. दहा फुटांचा पट्टा, दोन ओळींतील अंतर दोन फूट, तर दोन बेण्यांमधील अंतर दीड फूट ठेवले. "को 86032' वाणाच्या दोन डोळा पद्धतीचा वापर बेण्यासाठी केला. 16 एमएम x 0.40 मीटर x 2.1 लिटर प्रति तास पद्धतीने सबसरफेसची मांडणी असून, सबसरफेसची लॅटरल सात इंच खोलीवर आहे. याबाबत हिरवे म्हणाले, की पूर्वी सरफेस ठिबकद्वारे ऊस घेत होतो. उत्पादन एकरी 70 ते 85 टनांपुढे जात नव्हते. मात्र सबसरफेसच्या वापरामुळे कमी पाण्यात वाफसा स्थिती टिकून राहिली, फुटव्यांची संख्या योग्य राखता आली. पिकाच्या वाढीनुसार पाणी देणे शक्य झाले. एकरी गाळपयोग्य सुमारे 42 हजार ऊस राखता आल्याने उत्पादनात 30 ते 35 टक्के वाढ झाली. लागवडीपूर्वी शेतात पाचट कुजविणे तसेच जैविक खतांच्या वापराचाही फायदा झाला. सबसरफेससाठी एकरी 28 हजार रुपये खर्च झाला.
सुरवातीला जमिनीची उभी- आडवी नांगरट करून आठ दिवसांनी ट्रॅक्टरच्या साहाय्याने कल्टिव्हेटर वापरले. चार-पाच दिवसांनी रोटाव्हेटरचा वापर करून एकरी चार ते पाच टन चांगले कुजलेले शेणखत शेतात मिसळून दिले. जमीन मऊ, बारीक व भुसभुशीत केली. ठिबकची ड्रीपलाइन ज्या अंतरावर पसरायची होती, त्या ठिकाणी दोन फुटांच्या पट्ट्यामध्ये एकरी 100 किलो डीएपी, 100 किलो एमओपी, 50 किलो निंबोळी पेंड, तीन किलो गंधक युक्त खत, तीन किलो सूक्ष्म अन्नद्रव्ये, तीन किलो झिंक सल्फेट, तीन किलो फेरस सल्फेट मातीत चांगले मिसळले. खत दिलेल्या पट्ट्यावर सबसरफेसची लॅटरल टाकली.
लागवडीपूर्वी बेणेप्रक्रिया करताना एक ग्रॅम कार्बेन्डाझिम, तीन मि.लि. मॅलॅथिऑन प्रति लिटर पाण्यात मिसळून द्रावणामध्ये 15 मिनिटे बेणे बुडवून ठेवले. सावलीत सुकवून अर्ध्या तासाने जैविक बेणेप्रक्रिया केली. त्यात 300 ग्रॅम ऍझेटोबॅक्टर, 300 ग्रॅम पीएसबी प्रति 100 लिटर पाण्यात मिसळून या द्रावणात बेणे तीस मिनिटे बुडवून सावलीत सुकवले. जोड ओळ पट्टा पद्धत वापरायची असल्याने दहा फुटांवर लॅटरल टाकून त्याच्या दोन्ही बाजूला लागवड केली. त्यानंतर 60 ते 65 दिवसांनी छोट्या ट्रॅक्टरने व त्यानंतर 90 ते 95 दिवसांनी पुन्हा भर लावली. दोन्ही वेळेस पट्ट्यातील तणांचे नियंत्रण चांगले झाले. मोठी बांधणी करताना एकरी फुटव्यांची संख्या योग्य ठेवण्यावर लक्ष दिले.
...अशी दिली खतमात्रा मुख्य बांधणीवेळी एकरी 75 किलो डीएपी, 75 किलो म्युरेट ऑफ पोटॅश, 100 किलो युरिया, सहा किलो सूक्ष्म अन्नद्रव्ये, झिंक सल्फेट सहा किलो, आठ किलो फेरस सल्फेट आणि 100 किलो सेंद्रिय खत वापरले. ही सर्व खते ओळीत टाकून मातीत मिसळून घेतली. त्यानंतर बांधणी करून 15 दिवसांनी ठिबकद्वारे एकरी एक लिटर ऍसिटोबॅक्टर, एक लिटर पीएसबी आणि एक लिटर केएसबी दिले.
ठिबकद्वारे खताचे वेळापत्रक - (प्रति पाच एकर प्रति पाच दिवस) 13-0-45-------10 किलो- 15 ते 60 दिवसांदरम्यान
12-61-00-----10 किलो- 60 ते 90 दिवसांदरम्यान
19-19-19-----15 किलो-90 ते 120 दिवसांदरम्यान
0-0-50--------10 किलो- 120 ते 280 दिवसांपर्यंत
पाणी देण्याचे वेळापत्रक - लागवडीनंतरचे महिने------एमएम प्रति एकर
एक ते दोन--------------दोन ते अडीच
तीन ते पाच-------------अडीच ते तीन
सहा ते दहा-------------दोन ते अडीच
दहा ते बारा-------------चार ते साडेचार
लागवडीनंतर दीड महिन्याने एकरी दोन लिटर ह्युमिक ऍसिड दोन वेळा दर दहा दिवसांनी दिले. लागवडीनंतर चौथ्या, पाचव्या व सहाव्या महिन्यात फिनोलेक्स कंपनीचे ड्रीपझाईम एक लिटर प्रति एकरी ड्रीपद्वारे दिले. तणनियंत्रणासाठी ऍट्राझीन व 2-4, डी तणनाशकांचा वापर केला. पिकाच्या पाणी व्यवस्थापनात हिरवे यांना फिनोलेक्सचे संचालक (मार्केटिंग) डॉ. नरेंद्र राणे आणि सहायक व्यवस्थापक (कृषी) विठ्ठल गोरे यांचे मार्गदर्शन मिळाले.
तंत्रज्ञान वापर हायलाईट्स - - सबसरफेसमध्ये प्रेशर क्रॉम्प्रेन्सिव्ह नॉन ड्रेन (पीसीएनडी) ड्रीपलाइन वापरली. यामुळे मुळांच्या कक्षेत 40 सें.मी.पर्यंत सतत वाफसा स्थिती राहिली. पाणी व खतांची उपलब्धता समान प्रमाणात झाली.
- पांढऱ्या मुळांची संख्या वाढली. मुळे सक्षम राहिल्याने खते व पाण्याचा कार्यक्षम वापर झाला.
- पिकाच्या अवस्थेनुसार तसेच वयानुसार योग्य पद्धतीने पाणी व्यवस्थापन करणे शक्य झाले. त्याचा परिणाम रोपांची एकरी संख्या मर्यादित ठेवता आली.
- दुष्काळी परिस्थितीत विहीर तसेच बोअरचे पाणी कमी पडले असता केवळ सहा ते सात हजार लिटर प्रति एकरी पाणी देऊनही ऊस जोपासता आला. त्याच्या वाढीवर विपरीत परिणाम न होता पेऱ्यांची संख्या सहा ते आठ इंचापर्यंत आणि कांड्यांची संख्या 28 ते 32 पर्यंत गेली.
- प्रति उसाचे वजन सरासरी अडीच ते तीन किलो भरले. एकरी सरासरी 105 टन उत्पादन मिळाले.
साखर कारखान्याकडे सुमारे पाच एकरातील ऊस गेला असून त्याला प्रति टन 2300 रुपये दर मिळाला आहे.
तंत्रज्ञान वापरल्याचे फायदे - - जमिनीत वाफसा टिकून राहिला
- सूक्ष्म जिवाणूंची संख्या वाढण्यास मदत झाली
- अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढली
- नियंत्रित पाण्यामुळे द्रव स्वरूपातील सामू आणि ईसी चांगला राहिला
हिरवे यांच्याकडून शिकण्यासारखे - - कमी मनुष्यबळात शेतीचे व्यवस्थापन
- उपलब्ध पाण्याचा काटेकोर वापर
- तंत्रज्ञान माहितीसंदर्भात मोकळेपणाने देवाण-घेवाण
- शिक्षणाचा शेतीत पुरेपूर वापर
उत्पादन खर्च (प्रति एकरी, रू.) - जमीन तयार करणे- -------4400
बेसल डोस (शेणखत पाच टन, जैविक, रासायनिक खते)------8,000
बेणे (प्रक्रिया आणि लागवड)-----------------------4400
बांधणी व रासायनिक खते----------9,000
दोन वेळा खुरपणी---------------------------1200
ठिबकद्वारे खते- ------------------------12,000
किरकोळ खर्च -------------------------3000
एकूण-------------------------------------42,000 रु.
Monday, April 22, 2013
कमी पाण्यात जोपासा ऊस -
या वर्षीच्या दुष्काळी स्थितीमुळे खात्रीशीर भागातही उसाला पाणी कमी पडू लागले आहे. मार्च ते जून या कालावधीत तीव्र उष्णतामान व पाण्याची कमतरता यामुळे आडसाली, पूर्वहंगामी, सुरू आणि खोडवा या सर्व पिकांच्या या कालावधीत येणाऱ्या वाढीच्या अवस्थेवर परिणाम होणार आहे. म्हणून या कालावधीत सर्व हंगामांतील पीकवाढीच्या अवस्थांचा अभ्यास करून उपाय योजना करावी.
डॉ. सुरेश पवार
सध्याच्या वाढत्या तापमानाच्या काळात मुख्यत्वे हवेतील व जमिनीतील तापमानात वाढ झाल्यामुळे ऊस पिकातील ओलाव्यात घट होते. या काळात वर्षातील बाष्पीभवनापैकी 40 ते 45 टक्के म्हणजे निम्मे बाष्पीभवन होते, तर जुलै ते ऑक्टोबर महिन्यात 30 ते 35 टक्के आणि उरलेले 35 टक्के नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात होते. सध्या दिवसाचा कालावधी जास्त असतो. दिवसाच्या व रात्रीच्या तापमानातील फरक कमी होतो म्हणजेच रात्रीचे तापमान वाढलेले असते.
जमिनीतील उपलब्ध पाणी कमी होऊन, मुळांच्या आसपासचे तापमान वाढून त्यांची कार्यक्षमता कमी होते. परिणामी मुळांद्वारे पाणी व अन्नद्रव्यांच्या शोषणात घट होते. उसाच्या पानांवरील पर्णरंध्रांद्वारे होणारे बाष्पीभवन कमालीचे वाढते.
या सर्व परिस्थितीमुळे ऊस पिकास पाण्याचा ताण बसतो आणि पिकाची वाढ समाधानकारक होत नाही. पाणीटंचाईमुळे ऊस पिकावर दुष्परिणाम होऊन उत्पादनात लक्षणीय घट होते. मुख्यत्वेकरून आडसाली उसाच्या उत्पादनावर विपरीत परिणाम होतो. कारण हा ऊस पूर्ण वाढीच्या अवस्थेत असतो. पूर्व हंगामी ऊस हा पूर्ववाढीच्या अवस्थेत असतो. या उसाची वाढ खुंटते, कांड्यांची लांबी व जाडी कमी होते. सुरू आणि खोडवा उसाला फुटव्यांचे प्रमाण कमी होऊन गाळपालायक उसांची संख्या कमी होते.
पाण्याच्या ताणाचे पिकावर होणारे परिणाम - पिकाची पाने बुडख्याकडून शेंड्याकडे वाळत जातात.
- मुळांची कार्यक्षमता घटते, त्यामुळे पाणी व अन्नद्रव्यांचे अपुरे शोषण होऊन प्रकाश संश्लेषण क्रिया मंदावते.
- अन्नरसाचे विविध भागांना होणारे वहन कमी होते.
- पानांतील हरितद्रव्यांचे प्रमाण घटते.
- उसातील तंतुमय पदार्थांचे प्रमाण वाढून उसात दशीचे प्रमाण वाढते.
- सुरू आणि खोडवा उसात फुटव्यांचे प्रमाण कमी होऊन गाळपालायक उसाच्या संख्येत घट झाल्याने ऊस उत्पादन घटते.
- पूर्व हंगामी व आडसाली उसाची वाढ खुंटून कांड्यांची लांबी व जाडी कमी होते.
पीक व्यवस्थापन - बाष्पीभवन पात्राचा वापर करून एकूण 75 मि.मी. बाष्पीभवन झाल्यावर पिकाला पाणी द्यावे.
- गांडूळ खताचा वापर हेक्टरी पाच ते सात टन इतका करावा.
- पाण्याच्या पाळीतील अंतर ठरविण्यासाठी टेन्सिओमीटर या उपकरणाचा वापर करावा, त्यामुळे प्रति हेक्टरी पाणी कमी लागते.
- उन्हाळ्यात पिकाला पाण्याचा ताण सहन करण्याची सवय लावण्यासाठी एक डिसेंबरपासून फेब्रुवारीअखेरपर्यंत पाण्याची पाळी दोन- तीन दिवसांनी वाढवत जावी, त्यामुळे पिकाची पाण्याचा ताण सहन करण्याची नैसर्गिक क्षमता वाढते. यामुळे पिकाची मुळे अधिक खोलवर जाऊन खालच्या थरातील उपलब्ध पाण्याचा वापर करतात.
- जमिनीतील उपलब्ध पाण्याचे प्रमाण 50 टक्क्यांच्या आसपास घटेल तेव्हाच पाणी द्यावे. ठिबक सिंचन पद्धतीने पाणी देण्याची पद्धत अवलंबावी. या पद्धतीत 50 टक्के पाण्याची बचत होते, उत्पादनातही वाढ होते.
- सऱ्या समपातळीत ओढाव्यात.
- पालाश खताची जादा मात्रा (60 कि.ग्रॅ. / हे.) लागणीच्या वेळेस जमिनीतूनच द्यावी.
- लागवड करताना बेणे म्युरेट ऑफ पोटॅश खताचे दोन टक्के द्रावण अथवा चार टक्के मॅंगेनीज सल्फेट द्रावण अथवा चार टक्के .....हिराकसच्या (फेरस सल्फेट) द्रावणात पाच मिनिटे बुडवून मगच लावावे.
- युरिया दोन टक्के (20 ग्रॅम प्रति लिटर पाणी), म्युरेट ऑफ पोटॅश दोन टक्के (20 ग्रॅम प्रति लिटर पाणी) या प्रमाणात संयुक्त द्रावण तयार करून त्याची फवारणी पिकावर त्याच्या वयाच्या 60, 120 व 180 व्या दिवशी करावी.
- चुनखडीचे पूर्ण विद्राव्य स्वरूपातील दोन टक्के द्रावण तयार करून त्यात बेणे दोन तास बुडवून मगच लावावे.
- उसाचे पाचट सरीत पसरून त्यावर प्रति टन पाचटासाठी आठ किलो युरिया व दहा किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि एक किलो पाचट कुजविणाऱ्या जिवाणूंचा वापर करावा.
- पाण्याच्या दोन पाळींतील अंतर 20 दिवसांपेक्षा जास्त वाढणार नाही याची काळजी घ्यावी.
- वाऱ्यापासून संरक्षण म्हणून शेताच्या पश्चिमेस व उत्तरेस शेवरी लावावी, त्यामुळे बाष्पीभवनाचा वेग नियंत्रित होतो.
- शेतातील पालापाचोळा व सेंद्रिय पदार्थ शेतातच गाडून हे खत उसासाठी वापरावे, यामुळे जमिनीतील कर्बाचे प्रमाण वाढून पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते.
पाण्याचा ताण पडणाऱ्या उसासाठी उपाययोजना - - पाण्याचा ताण सहन करणाऱ्या जातीची लागवड करावी (उदा. को 86032 आणि फुले 0235).
- पाण्याची कमतरता पडेल असे वाटत असेल तर उसाची लागवड जोड ओळ पद्धत किंवा एक आड एक सरीत करावी. ज्या भागात नेहमीच पाण्याचा ताण पडतो किंवा पाटपाण्याच्या पाळ्या सुटतात, अशा भागात उसासाठी लागवडीच्या वेळेस पालाश खताची मात्रा हेक्टरी 25 टक्के वाढवून द्यावी.
- पाणी कमी असते त्या वेळी उसाला एक आड एक सरीस पाणी द्यावे. म्हणजे पहिल्या वेळी ज्या सरीला पाणी मिळेल, त्यानंतर तिसऱ्या पाण्याच्या वेळीच तिला पाणी मिळेल.
- पाण्याचा ताण पडल्यास किंवा अचानक अवर्षण परिस्थिती आल्यास ऊस पिकातील खालची पक्व झालेली तसेच वाळलेली पाने काढून ती आच्छादन म्हणून सरीत पसरावीत.
- लागवडीच्या ऊस पिकात तसेच खोडवा पिकास हेक्टरी पाच ते सहा टन पाचटाचे आच्छादन करावे.
- पीक नेहमी तणविरहित ठेवावे.
- पिकास पाण्याचा ताण पडतो त्या वेळी दर 21 दिवसांनी दोन टक्के पालाश + दोन टक्के युरिया यांचे मिश्रण करून फवारणी करावी.
- उन्हाळ्यात तापमान वाढले व पाण्याची कमतरता असल्यास आठ टक्के केओलीन बाष्परोधकाची फवारणी करावी.
- ज्या ठिकाणी पाण्याची कमतरता असेल अशा ठिकाणी पाटाने पाणी देण्याच्या पद्धतीऐवजी ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब करावा.
उसाला करा ठिबक सिंचन - - ऊस पिकाच्या कार्यक्षेत्राच्या फक्त 70 टक्के भागातच पाणी दिल्यामुळे पाण्याची बचत 50 टक्क्यांपर्यंत होते.
- उपलब्ध पाण्यातच दुप्पट जमीन ओलिताखाली आणता येते.
- जमीन सतत वाफसा अवस्थेत राहून जमिनीत पाणी- प्राणवायूचे प्रमाण योग्य साधले जाते, त्यामुळे पिकाला गरजेनुसार पाण्याची व अन्नद्रव्याची उपलब्धता होऊन उत्पादनात 15 ते 20 टक्के वाढ होते.
- ठिबक सिंचनातून पाण्यात विरघळणारी विद्राव्य खते (उदा. युरिया, पांढरे म्युरेट ऑफ पोटॅश) देता येतात. खतांच्या कार्यक्षम वापरामुळे खत मात्रेत 25 टक्क्यांपर्यंत बचत करता येते.
- पाण्याच्या मर्यादित वापरामुळे उसातील साखर उतारा वाढतो.
- पाण्याच्या कमी वापरामुळे जमिनी क्षारयुक्त होण्याचा धोका कमी होतो.
- पृष्ठभागावरील जमिनीचा बराच भाग कोरडा राहत असल्याने तणांचा उपद्रव कमी होतो.
संपर्क - 02169 - 265334
(लेखक मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव, जि. सातारा येथे ऊस विशेषज्ञ म्हणून कार्यरत आहेत.)

Wednesday, April 17, 2013
गांडूळ खतावर पोसला डोंगर उतारावरील ऊस
डोंगर उताराच्या मुरमाड जमिनीत ऊस शेतीतून चांगले उत्पादन व उत्पन्न मिळविण्याचा उद्देश पाली (ता. शाहूवाडी, जि. कोल्हापूर) येथील अरविंद श्रीधर नानिवडेकर यांनी ठेवला आहे. यासाठी गेल्या सात - आठ वर्षांत त्यांनी शेतीमध्ये विविध प्रयोग केले आहेत. यातूनच त्यांनी कृषी विभागाच्या मदतीने गांडूळ खत प्रकल्प उभारला आहे. स्वतःच्या जमिनीची सुपीकता पोत टिकवत गांडूळ खताची विक्री करून जोड व्यवसायाचा एक वेगळा आदर्श त्यांनी शेतकऱ्यांसमोर ठेवला आहे.
कोल्हापूर जिल्ह्याच्या शाहूवाडी तालुक्यातील पश्चिम घाटाच्या रांगेत कासारी नदीकाठी पाली हे गाव वसले आहे. करंजफेण या ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये या गावाचा समावेश होतो. या गावात अरविंद नानिवडेकर यांची वडिलोपार्जित 14 एकर शेती आहे. सन 1983 मध्ये अरविंद एम.ए. झाले. उच्चशिक्षित होऊनही त्यांनी नोकरीच्या मागे न लागता वडिलोपार्जित शेती व्यवसायच करण्याचा निर्णय घेतला. अरविंद यांचे वडील श्रीधर यांना जनावरे पाळण्याचा शौक होता. वडिलांच्या काळात गोठ्यात जवळपास 60 जनावरे असत. आजही अरविंद यांच्या गोठ्यात दहा संकरित गाई, दोन संकरित म्हशी आहेत. येथील हवामान जनावरांच्या संगोपनासाठी पोषक आहे; तसेच येथे उन्हाळ्यात चाऱ्याची टंचाईही भासत नाही. यामुळे कमी खर्चात अधिक उत्पन्न पशुपालनाच्या व्यवसायातून मिळविणे सहज शक्य आहे.
डोंगर उतारावर ऊस शेती
अरविंद यांची शेती ही डोंगरमाथ्यावर आहे. बरेचसे शेत उतारावर असल्याने ते पडीकच ठेवणे भाग होते. पण, अरविंद यांनी या पडीक जमिनीत ऊस शेतीचा प्रयोग करण्याचा निर्णय घेतला. येथील बरेचसे शेतकरी डोंगर उतारावर शेती करताना डोझरच्या साहाय्याने जमीन समपातळीत करून घेतात. यासाठी लाखो रुपये खर्च करतात. कर्ज काढून इतका खर्च करणे अरविंद यांना मान्य नव्हते. त्यांनी डोंगर उतारावरच ऊस शेतीचा निर्णय घेतला. दरवर्षी करण्यात येत असलेल्या नांगरटीमधून हळूहळू ही जमीन समपातळीत करण्याकडे त्यांचा कल राहिला. अरविंद यांचे उसाचे एकूण क्षेत्र 14 एकर आहे. यातील डोंगर उतारात दोन एकर क्षेत्र आहे. यातून उसाचे एकरी 25 टन उत्पादन ते घेतात. तर इतर क्षेत्रातून एकरी 40 टनांपर्यंत उत्पादन त्यांना मिळते. खोडव्याचे उत्पादन 30 ते 35 टनांपर्यंत मिळते.
गांडूळ खत निर्मितीकडे...
डोंगर उतारात नांगरट केल्यानंतर अरविंद यांच्या शेतात मातीऐवजी मुरूमच अधिक होता. या शेतात पिके कशी उगविणार आणि यातून उत्पन्न तरी किती मिळणार? हा प्रश्न अरविंद यांना सतावत होता. यावर कृषी मदतनीस शिवाजी ढवळे आणि तालुका कृषी अधिकारी भाऊसाहेब धुमाळ यांनी अरविंद यांना गांडूळ खताचा पर्याय सुचविला. सन 2005 मध्ये गांडूळ खत निर्मितीसाठी कृषी विभागामार्फत अनुदानही वाटप केले जात होते. गांडुळांमुळे जमिनीची मशागतही होईल व सेंद्रिय खतामुळे जमिनीचा पोतही सुधारला जाईल या हेतूने अरविंद यांनी गांडूळ खत निर्मितीचा निर्णय घेतला.
शेड उभारणीसाठी शासनाचे अनुदान
अरविंद यांनी गांडूळ खताच्या निर्मितीसाठी शेडची उभारणी केली. या शेडमध्ये 20 फूट लांब, तीन फूट रुंद आणि अडीच फूट उंचीचे हौद बनविले. या हौदात गांडूळ खत निर्मितीसाठी सुरवातीला वाळलेला काडीकचरा त्यावर शेण, परत ओला काडीकचरा, त्यावर शेणकाला असे करत हौद संपूर्णपणे भरला. त्यात सतत ओलसरपणा राहील इतके पुरेसे पाणी टाकले. त्यात 25 किलो गांडूळ कल्चर टाकले. शेड उभारण्यासाठी आणि हौदांच्या निर्मितीसाठी अरविंद यांना 60 हजार रुपये खर्च आला. यात कृषी विभागाने शेड उभारणीसाठी 15 हजार रुपयांचे अनुदान दिले; तसेच दहा हजार रुपयांचे जयसिंगपूर येथील गांडूळ प्रकल्पातून गांडूळ कल्चरही (गांडूळ बीज) उपलब्ध करून दिले. चांगल्या प्रतीचे गांडूळ खत तयार होण्यासाठी साधारणपणे दोन महिन्यांचा कालावधी लागतो. दोन महिन्यांनंतर हे खत काढून त्यामध्ये पुन्हा नव्याने खतासाठी शेण व कल्चर टाकण्यात येते. साधारणपणे एका हौदात दोन टन खत तयार होते. वर्षातून चार ते पाच टप्प्यांत खत तयार केले जाते. खताच्या निर्मितीसाठी अर्धवट कुजलेले शेण वापरतात. ताजे शेण वापरल्यास उष्णतेमुळे गांडुळाचे बीज मरून जाण्याचा किंवा गांडुळांची वाढ योग्य प्रकारे न होण्याचाही धोका असतो.
वीस टन खताचे उत्पादन
अरविंद दरवर्षी साधारणपणे 50 ते 60 टनांपर्यंत खताचे उत्पादन घेतात; मात्र दोन वर्षांपूर्वी त्यांची हृदयविकारावर शस्त्रक्रिया झाली, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर खत उत्पादन घेण्यात अडचणी आल्या. यंदा त्यांनी केवळ 20 टन खताचे उत्पादन घेतले आहे. खत उत्पादनातील दहा टन खत स्वतःच्या शेतीसाठी वापरतात, तर उर्वरित खताची ते विक्री करतात. साधारणपणे साडेतीन रुपये प्रति किलो दराने खताची विक्री केली जाते. कोकणात फळबागांसाठी सेंद्रिय खताची टंचाई भासते. कोकणातील बागायतदार हे खत विकत घेऊन जातात.
कल्चरची निर्मिती
तीन फूट रुंद, दोन फूट उंच, दहा फूट लांबीचा खड्डा तयार केला जातो. त्यात पालापाचोळा, शेणखत टाकून दोन महिन्यांत कल्चर तयार केले जाते.
दुग्ध व्यवसायातून लाखाची कमाई
अरविंद यांनी गांडूळ खतासाठी जनावरांचे संगोपन केले आहे. दहा गाई, दोन म्हशी यांच्या संगोपनातून दररोज 40 ते 50 लिटर दूध उत्पादन मिळते; तसेच गांडूळ खतासाठी आवश्यक असणारे शेणही मिळते. दररोज साधारणपणे 100 किलो शेण मिळते. अरविंद दररोज 35 लिटर गाईचे दूध व सहा लिटर म्हशीचे दूध डेअरीला घालतात. यातून महिन्याला त्यांना दीड लाख रुपयांची कमाई होते. गांडूळ खत निर्मिती व जनावरांच्या संगोपनाचा खर्च वजा जाता वर्षाला त्यांना दीड लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळतो.
चारा व्यवस्थापन
जनावरांना बारमाही चारा मिळावा यासाठी एक एकरावर बाजरी व एक एकरावर यशवंत गवताची लागवड अरविंद यांनी केली आहे. या व्यतिरिक्त वाळलेले गवत, उसाचा पाला यांचाही वापर ते चारा म्हणून करतात.

ऊस पाचटापासून गांडूळ खत कसे तयार करावे?
गांडूळ खताच्या निर्मितीसाठी उत्तम निचरा होणारी जमीन निवडावी. जवळपास मोठी झाडे नसावीत, कारण या झाडांची मुळे गांडूळ खतातील पोषक घटक शोषून घेतात. गांडूळ खत निर्मितीसाठी खड्ड्यावर दिवसभर सावली राहण्यासाठी छप्पर करावे. त्याकरिता बांबू, लाकडे, उसाच्या पाचटाचा वापर करावा. छपराची मधील उंची 6.5 फूट, बाजूची उंची पाच फूट व रुंदी दहा फूट असावी; परंतु छपराचे वरील आवरण दोन्ही बाजूस एक - एक फूट बाहेर असावे म्हणजे छपराची बाहेरील रुंदी 12 फूट असावी. छपराची लांबी आपल्याकडे उपलब्ध असणाऱ्या उसाच्या पाचटानुसार कमी - जास्त होईल. अशा छपरामध्ये मध्यापासून एक - एक फूट दोन्ही बाजूस जागा सोडून साडेतीन फूट रुंदीचे व एक फूट उंचीचे दोन समांतर वाफे वीट बांधकाम करून तयार करावेत. आतील बाजूने प्लास्टर करावे, तसेच तळाच्या बाजूस कोबा करून घ्यावा. जादा झालेले पाणी जाण्यासाठी तळाशी पाइप टाकावा. वाफे करण्यासाठी दुसरी पद्धत म्हणजे वाफे जमिनीच्या वर बांधण्याऐवजी आठ - नऊ इंच खोलीचे दोन समांतर चर काढावेत, खड्ड्यातील माती चांगली चोपून चोपून टणक करावी.
पाचट कुजविणे
छपरामध्ये खोदलेल्या चरामध्ये अथवा वीट बांधकाम केलेल्या टाकीमध्ये उसाचे पाचट भरावे, त्याची उंची जमिनीपासून किंवा वीट बांधकामापासून 20 ते 30 सें.मी. ठेवावी. पाचट भरताना एक टन पाचटासाठी युरिया आठ किलो, सिंगल सुपर फॉस्फेट दहा किलो, पाचट कुजविणारे जिवाणू एक किलो आणि ताजे शेणखत 100 किलो वापरावे. या सर्वांचे पाण्यात मिश्रण करावे. पाचटाचा पाच ते दहा सें.मी. थर दिल्यानंतर त्यावर शेणखत, युरिया व सुपर फॉस्फेटच्या द्रावणाचा पातळ थर द्यावा. याचबरोबर पाचट कुजविण्याची क्रिया लवकर होण्यासाठी पाचट कुजविणारे संवर्धन एक टनास एक किलो या प्रमाणात समप्रमाणात प्रत्येक थरावर वापरावे. अशा पद्धतीने खड्डा वाफा भरल्यानंतर त्यावर पुरेसे पाणी मारावे. पाण्याने भिजवून घेतलेल्या पोत्याने एक झाकून टाकावे, दररोज त्यावर पाणी मारण्याची दक्षता घ्यावी. असे एक महिना पाणी मारल्यानंतर पाचट अर्धवट कुजलेले दिसेल, शिवाय उष्णता कमी झाल्याचे आढळून येईल. असे अर्धवट कुजलेल्या एक टन पाचटासाठी 20,000 आयसेनिया फोटेडा या जातीची गांडुळे सोडावीत. गांडूळ सोडल्यानंतर सर्वसाधारणपणे अडीच ते तीन महिन्यांनी पाचटापासून उत्तम प्रतीचे गांडूळ खत तयार झालेले दिसेल.
गांडूळ खत तयार झाल्याची चाचणी
पसर्व पाचटापासून अंडाकृती लहान विष्टेच्या गोळ्या झाल्याचे दिसून येते. पगांडूळ खताचा सामू सातच्या दरम्यान असतो. गांडूळ खताचा वास हा पाणी दिल्यानंतर मातीचा वास येतो तसा येतो. प खताचा रंग गर्द काळा असतो. पकार्बन ः नायट्रोजन गुणोत्तर 15 ः 20.1 असे असते.
गांडूळ खतामधील अन्नद्रव्यांचे प्रमाण हे गांडुळांच्या खाद्यासाठी वापरलेल्या सेंद्रिय पदार्थांनुसार बदलते. गांडूळ खतामध्ये नत्र, स्फुरद व पालाश या अन्नघटकांचे प्रमाण हे शेणखतामधील अन्नद्रव्यांपेक्षा जवळपास दुप्पट असते. सर्वसाधारणपणे पाचटापासून तयार केलेल्या गांडूळ खतामध्ये नत्र 1.85 टक्के, स्फुरद, 0.65 टक्के, पालाश 1.30 टक्के, सेंद्रिय कर्ब 35 ते 42 टक्के असते. एक हेक्टर क्षेत्रासाठी पाच टन गांडूळ खत लागणीच्या वेळी सरीमध्ये चळी घेऊन मातीमध्ये झाकून द्यावे.
- 02169 - 265313
मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव, ता. फलटण, जि. सातारा

दुग्ध व्यवसायातून साधली 'अर्थ'पूर्ण प्रगती
यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी आता शेतीसोबतच जोडधंद्यातून आर्थिक स्थैर्य मिळवू लागले आहेत. यापैकीच एक आहेत महागाव येथील मनेश हिंगाडे. कोरडवाहू शेतीला त्यांनी दुग्ध व्यवसायाची जोड दिली. शेतीला पूरक म्हणून सुरू केलेला दुग्ध व्यवसाय आता त्यांचा मुख्य व्यवसाय झाला आहे. पशुपालनाचा त्यांना शेतीच्या विकासासाठी चांगला फायदा झाला आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील महागावमध्ये मनेश हिंगाडे यांची बारा एकर शेती आहे. कोरडवाहू शेतीच्या बरोबरीने आर्थिक स्थैर्यासाठी कोणता पूरक व्यवसाय करावा? याचा अभ्यास करताना त्यांना पशुपालनातून चांगला नफा मिळेल असे लक्षात आले. सन 2004 मध्ये त्यांनी एका जर्सी गाईपासून दुग्ध व्यवसायाची सुरवात केली. दुधापासून मिळणारे उत्पन्न लक्षात आल्यावर त्यांनी टप्प्याटप्प्याने होल्स्टिन फ्रिजियन आणि जर्सी गाईंची खरेदी सुरू केली. गाई खरेदी करताना त्यांचे आरोग्य, दूध उत्पादन याचाही अभ्यास केला. अपेक्षित दूध उत्पादन देणाऱ्या गाई गोठ्यात आल्याने त्यांनी आणखी काटेकोरपणे व्यवस्थापनास सुरवात केली. गाई विकत घेण्यासाठी शेती उत्पन्नातील पैसा खर्च न करता दूध व्यवसायातून मिळणारा नफ्यातूनच गाईंची खरेदी केली. गाईंच्या चांगल्या व्यवस्थापनासाठी हिंगाडे यांनी शेताच्या जवळ 30 गुंठे जागेत गोठा बांधला आहे. गोठ्याचा आकार 60 x 30 फूट आहे. या गोठ्यात सध्या 20 गाई आहेत. यात तेरा होल्स्टिन फ्रिजियन, पाच जर्सी, एक फुले त्रिवेणी आणि एक देशी गाय आहे. याचबरोबरीने जवळच कालवडींचा स्वतंत्र गोठा, चारा साठवणीची जागा, गांडूळ खत प्रकल्प, व्हर्मीवॉश निर्मिती, शेणखताचा डेपो, लहानसा कुक्कुटपालन प्रकल्प, तसेच गोठ्याचे व्यवस्थापन सांभाळणाऱ्यांच्या निवासाची सोय केलेली आहे.
गाईंसाठी सकस चारा ः
चारा व्यवस्थापन योग्य असल्यास दुधाचे उत्पादन चांगले मिळते असा हिंगाडे यांचा अनुभव आहे. गाईंच्या खाद्यामध्ये कोरडा व हिरव्या चाऱ्याचा समावेश असतो. दर दिवशी प्रत्येक गाईला 20 किलो हिरवा चारा आणि दहा किलो कोरडा चारा दिला जातो. खाद्यामध्ये सोयाबीन भुसा, हरभरा भुसा, गहू भुसा व ज्वारी कडब्याचा वापर केला जातो. कोरडा चारा गावातील शेतकऱ्यांकडून खरेदी करून गोठ्याजवळच साठविला आहे. चाऱ्याच्या बरोबरीने पशुतज्ज्ञांच्या शिफारशीनुसार गाईंना खनिज मिश्रणही दिले जाते.
दुधाळ जनावरांना वर्षभर हिरवा चारा पोटभर मिळणे हे दूध उत्पादनाच्यादृष्टीने महत्त्वाचे आहे. यासाठी हिंगाडे यांनी 12 एकर क्षेत्रापैकी चार एकर शेत्रावर चारा पिकाची लागवड केली आहे. वर्षभर चारा उपलब्ध होईल अशा पद्धतीने वर्षभर टप्प्याटप्प्याने लागवडीचे नियोजन आहे. चारा पिकाचा एक पट्टा कापणीस आला की दुसऱ्या पट्ट्याची लागवड केली जाते. या दरम्यान तिसऱ्या पट्ट्यात पीक वाढत असते. चारा पिकातून सर्व अन्नघटक गाईंना मिळावेत याकडे हिंगाडे यांचे लक्ष आहे. चाऱ्याच्या प्रत्येक वाणाची वेगळ्या क्षेत्रात पेरणी न करता एका सरीमध्ये नेपिअर गवताच्या जयवंत जातीची, दुसऱ्या सरीमध्ये फुले यशवंत जातीची लागवड आहे. तिसऱ्या सरीत बरसीम लागवड केली आहे. कापणी करताना चारही सऱ्यांतील गवत कापले जातात. हा एकत्रित चारा कुट्टी यंत्रातून कुट्टी करून गाईंना दिला जातो. चारा लागवडीपासून ते कापणीपर्यंत योग्य नियोजन केल्याने गाईंना पोषणयुक्त आहार मिळतो. याशिवाय मारवेल, मका, चवळी आणि बरसीम या चारा पिकांची लागवड त्यांनी केली आहे.
स्वच्छता महत्त्वाची ः
स्वच्छता हा जनावरांना आजारापासून दूर ठेवण्याचा सर्वांत चांगला मार्ग आहे. याबाबत हिंगाडे म्हणाले, की गोठा नेहमी स्वच्छ राहावा यासाठी दोन माणसे दिवसभर आळीपाळीने काम पाहतात. जनावरांना पिण्याचे स्वच्छ पाणी पुरविले जाते. गाईंना रोज धुतले जाते. पुरेशा पाणी उपलब्धतेसाठी गोठ्याजवळच एक विंधन विहीर खोदली आहे. उन्हाळ्यात गाईंना उष्ण वाऱ्याचा त्रास होतो, त्याचा दूध उत्पादनावर थेट परिणाम होतो. गोठ्यातील तापमान थंड ठेवण्यासाठी त्यांनी गोठ्यामध्ये सूक्ष्म तुषार सिंचन बसविले आहे.
पशुवैद्यकाच्या सल्ल्यानुसार गाईंना लाळ्या खुरकूत, घटसर्प व फऱ्या रोगप्रतिबंधक लसीकरण करून घेतात. गरजेनुसार जंतनाशन केले जाते. दुधाळ गाईंना सर्वांत जास्त धोका कासदाहाचा असतो. हा आजार झाल्यावर जनावरांची खूप काळजी घ्यावी लागते. हा आजार होऊ नये म्हणून पशुतज्ज्ञांच्या शिफारशीनुसार भाकड काळातील नियोजन, कासेची स्वच्छता, गरजेनुसार औषधोपचार वेळेवर केले जातात. यंत्राने गाईंचे दूध काढले जाते. रेतनासाठी वळू सांभाळला आहे. जनावरांच्या आरोग्य व्यवस्थापनाच्यादृष्टीने मुक्त गोठा पद्धतीचा अवलंब आता सुरू करणार आहे.
शेणखत आणि गांडूळ खताची उपलब्धता ः
दुग्ध व्यवसायामुळे हिंगाडे यांच्याकडे दरवर्षी सरासरी 60 ट्रॉली शेणखत उपलब्ध होते. गोठ्यातील गोमूत्र शेणखताच्या युनिटमध्ये सोडले आहे. शेणखताच्या बरोबरीने हिंगाडे यांनी गांडूळ खताचा प्रकल्प उभारला आहे. या प्रकल्पातून दर महिन्याला तीन क्विंटल गांडूळ खताचे उत्पादन मिळते. गांडूळ खतातून व्हर्मीवॉश गोळा करण्यासाठी त्यांनी सिंमेटचे टाके बांधले आहे. त्यात दरमहा 500 लिटर व्हर्मीवॉश गोळा होते. शेणखत, गांडूळ खत, व्हर्मीवॉश आणि कोंबडीखताचा वापर शेतीमध्येच केला जातो. शिल्लक राहिलेले शेणखत, गांडूळ खत परिसरातील शेतकऱ्यांना विकले जाते.
दूध विक्रीचे नियोजन ः
गोठ्यातील 20 गाईंपैकी सध्या 10 गाई दुधात आहेत. या गाईंपासून दररोज 130 ते 150 लिटर दूध मिळते. दूध विक्रीबाबत हिंगाडे म्हणाले, की बाजार शोधण्याच्या प्रयत्नातूनच मी गावात हॉटेल सुरू केले. यामुळे लहान भावालाही रोजगार उपलब्ध झाला आणि दूध विक्रीचा प्रश्न मिटला. सरासरी 20 रुपये प्रति लिटर असा दर मी धरला आहे. दुधापासून दही, पेढा, खवा, श्रीखंड, पनीर तयार करून विक्री केली जाते. या उत्पादनांचा चांगला दर्जा असल्याने ग्राहकांकडून चांगली मागणी असते. साधारणपणे दरमहा वीस गाईंचा व्यवस्थापनाचा खर्च वजा करता सरासरी 25 हजार रुपये नफा मिळतो.
पीक उत्पादनातही वाढ ः दुग्ध व्यवसायातील नफ्यातून हिंगाडे यांनी बारा एकर शेती ठिबक खाली आणली आहे. या लागवड क्षेत्रात चार एकरावर चारा पीक, तीन एकर केळी, अडीच एकर हळद, एक एकर आले आणि एक एकर सोयाबीनची लागवड केली आहे. पिकांसाठी शेणखत व कंपोस्ट खताचा वापर केला जातो. शेणखत, गोमूत्र, व्हर्मिवॉश, गांडूळ खताच्या वापरामुळे जमिनीची सुपीकता कायम राखली गेल्याने पीक उत्पादनातही वाढ मिळत आहे. गेल्या वर्षी त्यांना दीड एकर केळीपासून एक लाख 40 हजारांचे उत्पादन मिळाले आहे. 32 गुंठे क्षेत्रांत त्यांना 150 क्विंटल ओल्या हळदीचे उत्पादन मिळाले, परंतु सध्या हळदीला भाव न मिळाल्याने प्रक्रिया करून ठेवली आहे. हिंगाडे हे कृषी विद्यापीठ तसेच कृषी विभागातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेतात. त्यांना सेंद्रिय शेती कृती आराखडाअंतर्गत गांडूळ खत युनिटसाठी 25 हजारांचे अनुदान, राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत केळीसाठी 24 हजार 960 रुपयांचे अनुदान मिळाले. शेतात जाण्यासाठी 500 मीटर लांबीचा रस्ताही स्वखर्चातून बनविला आहे. दरवर्षी पीक नियोजनातून त्यांना 3.5 लाख रुपये उत्पन्न मिळते. गांडूळ खत विक्रीतून 40 हजार रुपये, शेणखत विक्रीतून एक लाख रुपये आणि गवताचे ठोंब विक्रीतून 50 हजार रुपये उत्पन्न मिळते. दुग्ध व्यवसायातील प्रगती लक्षात घेऊन त्यांना यवतमाळ जिल्हा परिषदेच्या उत्कृष्ट पशुपालक पुरस्काराने सन्मान करण्यात आला.
कुक्कुटपालनाला सुरवात ः
दुग्ध व्यवसायासोबत हिंगाडे यांनी कुक्कुटपालन सुरू केले आहे. त्यांच्याकडे सध्या 300 गिरिराजा आणि 500 ब्रॉयलर कोंबड्या आहेत. कुक्कुटपालनासाठी त्यांनी 250 कोंबड्यांचे दोन युनिट उभे केले. आता अंडी व कोंबड्यांच्या विक्रीतून त्यांना उत्पन्न सुरू झाले आहे. साधारण 45 दिवसांत एका कोंबडीसाठी 70 रुपये खर्च होतात. साधारण 150 रुपयाला एका कोंबडीची विक्री होते. कुक्कुटपालनासाठी अनुदान मिळाले आहे.
ऍग्रोवन ठरला मार्गदर्शक ः
मनेश हिंगाडे हे दररोज ऍग्रोवन वाचतात. याबाबत ते म्हणाले की, पीक व्यवस्थापनाच्याबरोबरीने मुक्त गोठा, कुक्कुटपालन, जनावरांच्या आजारावरील औषधोपचार आणि घ्यावयाची दक्षता याबाबतची माहिती मला मिळतो. त्याचा फायदा मला पीक उत्पादन आणि जनावरांच्या व्यवस्थापनासाठी झाला आहे.
------------------------------------------------
संपर्क ः मनेश हिंगाडे ः 9423432649

Subscribe to:
Posts (Atom)