आडसाली हंगामात लावलेले ऊस पीक हे जोमदार वाढते, कारण उगवणीपासूनच या पिकास अनुकूल हवामान मिळते. तसेच पीकवाढीच्या कालावधीत दोन पावसाळी हंगामाचा फायदा मिळतो. त्यामुळे सुरू हंगामाच्या दीडपट उत्पादन मिळते. आडसाली उसाचा कालावधी 16 ते 18 महिने असल्यामुळे जमिनीची निवड व पूर्वमशागतीला विशेष महत्त्व आहे. तेव्हा त्याची पूर्वतयारी वेळेत करणे आवश्यक आहे.
ऊस उत्पादनाच्या दृष्टीने जमिनीची निवड आणि नियोजनाला अतिशय महत्त्व आहे. लागवडीसाठी पाण्याचा चांगला निचरा होणारी, एक ते दीड मीटर खोलीची, मध्यम काळी, 60 टक्केपेक्षा जास्त जलधारणाशक्ती असलेली तसेच सुपीक जमीन उसासाठी योग्य असते. जमिनीचा सामू 6.5 ते 8.5, क्षारांचे प्रमाण 0.5 टक्क्यापेक्षा कमी व चुनखडीचे प्रमाण 15 टक्क्यांपेक्षा कमी आणि सेंद्रिय कर्ब किमान 0.5 टक्का असावा.
जमिनीची पूर्वमशागत -
उसासाठी निवडलेल्या जमिनीची चांगली पूर्वमशागत करावी. पूर्वमशागतीमध्ये नांगरणी, ढेकळे फोडणे, कुळवणे, जमिनी सपाट करणे, सऱ्या काढणे, रान बांधणी करणे याचा समावेश होतो. पूर्वीचे पीक काढल्याबरोबर जमिनीची खोल नांगरट करावी. पहिल्या नांगरटीनंतर 15 ते 20 दिवसांनी दुसरी आडवी नांगरट करावी. नांगरणीमुळे जमीन मोकळी होऊन पाणी जमिनीत सहज मुरते, हवा खेळती राहते, पाण्याचा चांगला निचरा होतो, पूर्वीच्या पिकाचे अवशेष जमिनीत गाडले जाऊन सेंद्रिय पदार्थांची भर पडते. नांगरणीनंतर जमीन उन्हात तापू द्यावी. त्यानंतर जमिनीत ढेकळे असल्यास कुळवाने चालवून फोडावीत. त्यामुळे सरी चांगली पडते. ऊस पिकाला समप्रमाणात पाणी मिळण्यासाठी जमीन समपातळीत करून घ्यावी. दुसऱ्या नांगरणीपूर्वी हेक्टरी 30 बैलगाड्या चांगले कुजलेले शेणखत अथवा कंपोस्ट खत द्यावे. मध्यम प्रकारच्या जमिनीत एक मीटर आणि भारी जमिनीत 1.20 मीटर अंतरावर सऱ्या पाडाव्यात. जमीन सपाट असल्यास (0.3 टक्क्यापर्यंत उतार) 40 ते 60 मीटर अंतरावर आडवे पाट पाडून लांब सरी पद्धतीचा अवलंब करावा. पाण्याची बचत व ऊस पिकास जास्तीत जास्त सूर्यप्रकाश व खेळती हवा राहण्यासाठी पट्टा पद्धतीचा अवलंब करावा. यासाठी रिजरच्या साह्याने 2.5 किंवा तीन फूट अंतरावर सलग सऱ्या पाडाव्यात. सलग दोन सऱ्यांत लागवड करून तिसरी सरी मोकळी ठेवावी. त्यामुळे 2.5 ते पाच फूट किंवा तीन ते सहा फूट अंतरावर जोडओळीची पट्टा पद्धतीने लागवड करणे सुलभ होते. ऊस लागणीपूर्वी सेंद्रिय खताचा दुसरा हप्ता हेक्टरी 30 बैलगाड्या चांगले कुजलेले शेणखत अथवा कंपोस्ट खत सरीमध्ये टाकावे. कंपोस्ट/ शेणखत उपलब्ध नसल्यास लागवडीपूर्वी ताग/ धैंचा हिरवळीची पिके घेऊन पीक फुलोऱ्यात असताना जमिनीत गाडावीत.
खत व्यवस्थापन -
जमिनीची सुपीकता व उत्पादकता वाढविण्यासाठी आडसाली उसाला प्रति हेक्टरी अनुक्रमे 30 टन शेणखत अथवा कंपोस्ट खत लागवडीपूर्वी दुसऱ्या नांगरटीच्यावेळी अर्धी मात्रा व उरलेली अर्धी मात्रा सरी सोडण्यापूर्वी द्यावी. शेणखत अथवा कंपोस्ट खत उपलब्ध नसल्यास ताग, धैंचा यांसारख्या हिरवळीच्या पिकांचा किंवा प्रेसमड केक हेक्टरी सहा टन किंवा गांडूळखत हेक्टरी पाच टन वापरावे. कंपोस्ट/ शेणखत उपलब्ध
नसल्यास उन्हाळ्यात ताग/ धैंचा पीक घेऊन तो फुलावर येताच (45-50 दिवस) ट्रॅक्टरच्या साह्याने जमिनीत गाडावा. जमिनीस शेणखत/ कंपोस्ट खत अगर हिरवळीच्या खतामुळे सेंद्रिय पदार्थांची भर पडून सूक्ष्म जिवाणूंची वाढ भरपूर होऊन जमिनीची जलधारणा शक्ती
वाढते. जमीन भुसभुशीत होते.
शिफारशीत वाण -
आडसाली ऊस लागणीचा योग्य कालावधी जुलै/ ऑगस्ट असून तोडणी पुढील वर्षाच्या नोव्हेंबर/ डिसेंबरमध्ये केली जाते. आडसाली ऊस पीक साधारणपणे 15 ते 17 महिने शेतात उभे असते. यासाठी मध्यम पक्व होणाऱ्या को-86032 (नीरा) व को.एम. 0265 (फुले 265) या वाणांची शिफारस करण्यात आली आहे. या वाणांची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत.
लागवडीसाठी बेण्याची निवड -
ऊस उत्पादनवाढीसाठी बेणे मळ्यातील ऊसच लागवडीसाठी वापरावा. या बेण्याचा वापर केल्याने ऊस उत्पादनात दहा टक्के वाढ होते. प्रथम शेतकऱ्यांनी वरीलप्रमाणे शिफारशीत वाणांची निवड करावी. त्यानंतर त्या वाणाच्या बियाण्याची उपलब्धता पाहावी. ऊस बेण्याची निवड करताना
पुढील बाबी विचारात घ्याव्यात.
1) सुधारित जातीचे शुद्ध व भेसळविरहित बेणे निवडावे.
2) बेणे रसरशीत असावे, कांड्या लांब आणि जाड असाव्यात.
3) कांड्यांची वाढ चांगली झालेली असावी. डोळे फुगीर असावे.
4) बेणे रोग आणि कीडमुक्त असावे.
5) 10 ते 11 महिने वयाचे बेणे असावे. बेणे ताजे असावे. 24 तासांच्या आत लागण करावी. याप्रमाणे आडसाली उसाची पूर्वतयारी केल्यास उसाची वेळेत लागवड होऊन बेण्याची उगवण चांगली होते. त्यामुळे उत्पन्नात निश्चितच वाढ होईल.
---
संपर्क - 02169-265335
(लेखक मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव, जि. सातारा येथे कार्यरत आहेत.)
Monday, April 29, 2013
Thursday, April 25, 2013
वांगी उत्पादनात ओलांडली "लक्ष्मण'रेषा
टेंभुर्णी (ता. माढा, जि. सोलापूर) येथील लक्ष्मण देविदास सोनवणे यांनी आठ एकर क्षेत्रावर संकरित वांग्याची लागवड करून केवळ दीडच महिन्यात किफायतशीर उत्पन्न मिळविले आहे. चोख व्यवस्थापन, अपार कष्ट व जिद्दीच्या बळावर त्यांनी उत्पादनाची "लक्ष्मण'रेषा ओलांडली आहे.
टेंभुर्णी (जि. सोलापूर) येथील लक्ष्मण देविदास सोनवणे यांचा कच्च्या चामड्यापासून पक्के चामडे बनविण्याचा व्यवसाय होता. या व्यवसायात त्यांनी कालांतराने बदल केला. बाजारपेठेचा अभ्यास करून वाद्य बनविण्याची कला त्यांनी आत्मसात केली. पक्के चामडे बाजारात विकण्यापेक्षा त्यापासून तबला, डग्गा, ढोलकी, मृदंग, हलगी ही चर्मवाद्ये बनविण्याचे काम सुरू केले. वाद्य बनविण्याकामी संपूर्ण परिवाराचा विशेष हातखंडा आहे. या वाद्यांना राज्यभरात मागणी आहे. सोनवणे यांचा पाच भावंडांचा परिवार असून, चार बंधूंचे कुटुंब एकत्रित आहे. सुमारे वीस सदस्यांच्या या एकत्रित परिवाराचे लक्ष्मणराव हे कुटुंबप्रमुख आहेत. वाद्यनिर्मितीच्या बरोबरीने त्यांनी शेतीकडेही तेवढेच लक्ष दिले आहे.
यश-अपयशातून शेती केली यशस्वी ः
शेतीमधील प्रगतीबाबत माहिती देताना लक्ष्मणराव म्हणाले, ""वाद्य बनविण्याच्या व्यवसायाबरोबरच शेतीची आवड असल्याने 2005 मध्ये 23 एकर जिरायती शेती विकत घेतली. त्यात पाण्याच्या सोयीसाठी दोन विहिरी खोदल्या. त्यांना चांगले पाणी लागले. सुरवातीला 2006 मध्ये दोन एकरांवर ऊस लावला होता; परंतु भारनियमन व इतर काही कारणांमुळे फारसे उत्पादन मिळाले नाही, त्यामुळे पीकबदल करून नंतर साडेसात एकरांवर मिरची लागवड केली. पिकाचे काटेकोर व्यवस्थापन केले. हिरवी व लाल मिरची विकून त्यातून सुमारे साडेआठ लाख रुपये उत्पन्न मिळाले. 2008 मध्ये पाच एकर क्षेत्रावर उघड्यावरील ढोबळी मिरची लागवडीचा प्रयोग केला होता; परंतु या पिकात तोटा झाला. त्याच वर्षी "ग्रॅंडनैन' जातीची केळी लावली; मात्र त्याचाही प्रयोग फसला. 2009 मध्ये केळी बाग काढून टाकली. आठ एकर क्षेत्रावर काकडी लागवड केली. त्यात मात्र चांगले यश मिळाले. काकडीला चांगला भाव मिळून त्यातून आठ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. आठ एकरांवर डाळिंब लावले आहे. त्यात गेल्या वर्षी आंतरपीक म्हणून साडेतीन एकर क्षेत्रावर वांगी लागवड केली होती. वांग्याला प्रति किलो 15 रुपयांपासून 38 रुपयांपर्यंत भाव मिळाला. एकूण साडेसहा लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. एकंदरीतच शेतीमध्ये भाजीपाला पिकांचा चांगला अनुभव आला. मार्केटचाही अभ्यास झाल्याने दरवर्षी काकडी व वांगी लागवड करण्याचा निर्णय घेतला.''
...असे असते लागवडीचे नियोजन ः
पीक लागवडीबाबत श्री. सोनवणे म्हणाले, की उन्हाळ्यात काकडीचा खप जास्त असतो. मागणीप्रमाणे आवकही भरपूर असते, त्यामुळे भाव त्याप्रमाणातच मिळतो. मे महिन्यात लागवड केलेली काकडी जूनमध्ये सुरू होते, तोपर्यंत बाजारात उन्हाळी काकडीची आवक कमी झालेली असते. परिणामी या काकडीला चांगला भाव मिळतो. हे गणित लक्षात घेऊन मेच्या पहिल्या आठवड्यात काकडी लागवडीचे नियोजन करतो, तसेच साठ दिवसांचे काकडी पीक घेऊन जमिनीची पुन्हा मशागत करून ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात वांगी लागवडीचे नियोजन करणेही सोपे होते. फेब्रुवारीपर्यंत वांगी पिकाच्या व्यवस्थापनाकडे लक्ष दिले जाते. पुढे मार्च ते मे दरम्यानच्या काळात रान विश्रांतीसाठी मोकळे ठेवले जाते. या कालावधीत वाद्य बनविणे व त्यांची विक्री याकडे लक्ष देता येते.
वांगी लागवडीचे नियोजन ः
वांगी लागवडीबाबत श्री. सोनवणे म्हणाले, की काकडी लागवडीसाठी तयार केलेल्या वाफ्यांत शेणखताचा चांगला वापर केलेला असतो, त्यामुळे याच वाफ्यांची चांगली मशागत करून त्यावर वांगी लागवड केली जाते. चालू वर्षी दोन ऑगस्टला रोपवाटिकेतून रोपे आणून आठ एकरांवर वांग्याची लागवड केली आहे. त्यासाठी प्रति रोप 55 पैसे याप्रमाणे रोपे घरपोच आणली. एकरी एक हजार आठशे रोपे लावली आहेत. लागवडीचे अंतर 7 x 3 फूट ठेवले आहे. काकडीला पाणी देण्यासाठी केलेल्या ठिबक सिंचनाद्वारेच वांग्यालाही पाणी दिले जाते.
एक एकर वांगी लागवडीच्या नियोजनाबाबत श्री. सोनवणे म्हणाले, की रोपे लागवडीनंतर चार दिवसांनी प्रत्येकी 100 किलो 18ः46ः00, एमओपी, निंबोळी पेंड व सिंगल सुपर फॉस्फेट यांची पहिली मात्रा दिली. त्यानंतर रोपांच्या वाढीसाठी पहिला महिनाभर दररोज एक किलो 19ः19ः19 व फुटव्यांसाठी एक किलो 12ः61 ठिबकद्वारे देण्यात आले.
फुलोरा आल्यानंतर फुलगळ होऊ नये, फळधारणा चांगली व्हावी, योग्य प्रमाणात फुटवे यावेत, फळांना चमक येण्यासाठी 18ः46ः00, म्युरेट ऑफ पोटॅश, निंबोळी पेंड, तसेच सूक्ष्म अन्नद्रव्यांचा तज्ज्ञांच्या सल्ल्याने शिफारशीत प्रमाणात वापर केला. रोपे एक महिन्याची झाल्यावर शेंडेअळी, फळ पोखरणारी अळी, पानांतील रस शोषणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाप्रमाणे फवारण्या केल्या. वांग्याच्या व्यवस्थापनात प्रशांत कुंभार यांचेही मार्गदर्शन मिळते.
साधारणपणे 15 ऑक्टोबरला वांग्याची तोड सुरू झाली. आठवड्यातून दोन तोडे होतात. आठ एकरांतून दर आठ दिवसाला सुमारे 12 टन माल निघतो. आतापर्यंत 60 टन उत्पादन मिळाले आहे, त्यातून 12 लाख रुपये उत्पन्न मिळाले. वांगी काढणी अजून सुरू असून, फेब्रुवारीपर्यंत आणखी 100 टन उत्पादन मिळेल. भाव कमी झाला तरीही 20 लाखांपर्यंत उत्पन्न मिळेल, अशी अपेक्षा सोनवणे यांनी व्यक्त केली.
प्रतवारी, पॅकिंगवर दिला भर ः
प्रतवारी केलेल्या मालाला चांगला भाव मिळतो असे लक्ष्मणराव यांच्या लक्षात आले. तेव्हापासून त्यांनी प्रतवारी तसेच पॅकिंग यावर जास्त भर दिला. शेतातून वांगी तोडल्यावर लगेच त्यांची प्रतवारी केली जाते. त्यात सुमारे 80 ग्रॅम वजनाची फळे एक नंबरच्या क्रेटमध्ये, तर मध्यम आकाराचे वांगे दोन नंबरच्या क्रेटमध्ये आणि तोडायचे चुकून राहिलेले वांगे मोठे होते, ते तीन नंबरच्या क्रेटमध्ये ठेवले जाते. भरितासाठी मोठ्या वांग्यांना मागणी मिळत असल्याचे श्री. सोनवणे यांनी सांगितले.
"चमक-धमक' हेच मार्केटिंगचे तंत्र ः
"चमक-धमक' असलेल्या मालाकडे ग्राहकांचा ओढा असतो, त्यास चांगला भाव मिळतो. मार्केटिंगचे हेच तंत्र सोनवणे यांनी वापरले आहे. प्रतवारी व पॅकिंग केलेला माल मुंबईच्या वाशी येथील बाजारपेठ पाठविला जातो. एका बॉक्समध्ये सुमारे 58 ते 60 किलो माल असतो. बॉक्स पॅकिंग करण्यासाठी शेतातच छोटेखानी पॅकिंग शेड उभारले आहे. यामध्ये प्रतवारी केलेल्या मालाचे वजन करून बॉक्स भरले जातात. भरलेले बॉक्स आवळपट्टीने आवळले जातात, त्यावर शेतकऱ्याचे नाव व .............वकल नंबर लिहिला जातो. हा माल भाजीपाल्याची वाहतूक करणाऱ्या टेम्पोतून मुंबईला पाठविला जातो, त्यासाठी प्रति बॉक्स 100 रुपये भाडे आकारले जाते. बॉक्स पॅकिंग केल्यामुळे वांगी ताजी व टवटवीत राहतात. देठांना देठ घासत नाहीत. हवाबंद असल्यामुळे लवकर सुकत नाही. त्यामुळे इतरांपेक्षा या वांग्यांना नेहमीच जास्त भाव मिळतो, असा सोनवणे यांचा अनुभव आहे.
एक नंबरच्या वांग्याला आतापर्यंत सर्वांत जास्त प्रति किलो सुमारे 26 ते 27 रुपये भाव मिळाला. दोन नंबरच्या वांग्याला 16 ते 17 रुपये, तर तीन नंबरच्या वांग्याला सहा ते सात रुपये प्रति किलो भाव मिळाला आहे. बाजारात मालाची आवक वाढल्याने आता थोडे भाव कमी झाले आहेत. नाशिकहून पोत्यातून येणाऱ्या वांग्यांना प्रति किलो सहा रुपये, तर तुलनेने बॉक्समधील वांग्यांना 12 रुपये प्रति किलो भाव मिळत आहे. गुणवत्तेला प्राधान्य दिल्यामुळे बाजारपेठेत माल बॉक्समधून न फोडताच पुढे पाठविला जातो. व्यापाऱ्यांचा एवढा विश्वास सोनवणे यांनी संपादन केला आहे.
एकत्रित कुटुंबाचा फायदा ः
एकत्रित कुटुंबाचा चांगला फायदा होतो असे सोनवणे सांगतात. मजूर कामावर येण्याच्या अगोदर घरातील मंडळी शेतीकामाला सुरवात करतात. यामध्ये लक्ष्मण यांची पत्नी सौ. सुरेखा, भास्कर व सौ. माधवी, प्रकाश व सौ. सुशीला, शिवदास व सौ. अरुणा यांच्याबरोबरीने मुले नीलेश, सोमनाथ, सूरज, रोहित, दयानंद, वैभव, दिनेश, राहुल आणि कु. स्वाती, कु. पूजा, कु. आरती, कु. पल्लवी या मुलींची शेतातील खुरपणी, पाणी देणे, जनावरांना गवत काढणे, मजुरांवर देखरेख, वांगी तोडणे, प्रतवारी करणे, पॅकिंग करणे या कामी खूप मदत होते. मजुरांची वेळ संपल्यावर उर्वरित कामे घरची मंडळी करतात. मुले व मुली शाळा-कॉलेज व अभ्यास करून उरलेल्या वेळेत शेतीकामात लक्ष घालतात, त्यामुळे मोठ्या प्रमाणात मजूरखर्चात बचत होते.
जमा-खर्चाचा ताळमेळ (एकरी) ः
रोपे (1,800) - 990 रुपये, लागवड - सहा हजार रुपये, खते - 11 हजार तीनशे रुपये, फवारणी - आठ हजार रुपये, पॅकिंग बॉक्स पॅकिंग पट्टीसह - आठ हजार सातशे पन्नास रुपये, मजूर (काढणीसाठी) - 10,560 रुपये, वाहतूक - 12 हजार 500 रुपये. एकूण 58 हजार 100 रुपये.
आतापर्यंत प्रति एकरी एक लाख पन्नास हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. यातून 58 हजार 100 रुपये खर्च वजा जाता एकरी 91 हजार 900 रुपयांचे निव्वळ उत्पन्न मिळाले आहे.
संपर्क ः
लक्ष्मण सोनवणे - 9422384412

एकात्मिक पद्धतीने करा वांगी पिकातील कीड नियंत्रण
वांगी पिकावर तुडतुडे, पांढरी माशी, तसेच शेंडे व फळ पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून येतो. या किडींच्या प्रादुर्भावामुळे उत्पादनावर परिणाम होतो. हे लक्षात घेऊन एकात्मिक पद्धतीने किडींच्या नियंत्रणासाठी उपाययोजना करावी. - शरद दळवे
वांगी लागवडीपूर्वी बियाण्यास इमिडॅक्लोप्रिड पाच ग्रॅम प्रति किलो बियाणे आणि ट्रायकोडर्मा पाच ग्रॅम प्रति किलो बियाणे याप्रमाणे बीजप्रक्रिया करावी. रोपे तयार करताना वाफ्यांमध्ये निंबोळी पेंड पाच किलो प्रति वाफा या प्रमाणात वापरावी. जर बीजप्रक्रिया केलेली नसेल, तर वाफ्यात रोपे उगवल्यानंतर दाणेदार फोरेट 20 ग्रॅम प्रति वाफा किंवा डायमेथोएट 10 मि.लि. प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून दोन वेळा 15 ते 30 दिवसांनंतर रोपे उगवल्यानंतर फवारावे.
लागवडीच्या वेळी नियोजन - - लागवडीसाठी जमिनीची योग्य नांगरट करून योग्य अंतरावर सऱ्या पाडाव्यात. हलक्या जमिनीत 75 सें.मी. बाय 75 सें.मी., जास्त वाढणाऱ्या किंवा संकरित जातीसाठी 90 सें.मी. बाय 90 सें.मी. अंतर ठेवावे. मध्यम किंवा काळ्या कसदार जमिनीत कमी वाढणाऱ्या जातींसाठी 90 सें.मी. बाय 75 सें.मी. व जास्त वाढणाऱ्या जातींसाठी 120 सें.मी. बाय 80 सें.मी. अंतर ठेवावे.
- शेतीच्या कडेने एक ओळ मका आणि दोन मक्यामध्ये एक चवळीचे बी याप्रमाणे टोकण पद्धतीने आंतरपिके लावावीत.
- माती परीक्षणानुसार प्रति हेक्टरी 150 किलो नत्र - 60 किलो स्फुरद - 60 किलो पालाश या पद्धतीने खतमात्रा द्यावी.
- पुनर्लागवडीपूर्वी इमिडॅक्लोप्रिड 20 मि.लि. + ट्रायकोडर्मा 50 ग्रॅम प्रति 10 लिटर पाणी + 5 टक्के निंबोळी अर्क या द्रावणात रोपांची मुळे तीन मिनिटे बुडवून ठेवावीत.
- सूत्रकृमींच्या नियंत्रणासाठी निंबोळी पेंड हेक्टरी 400 किलो किंवा दाणेदार कार्बोफ्युरॉन 33 किलो प्रति हेक्टरी रोपे लावल्यानंतर 10 दिवसांनी रिंगण पद्धतीने टाकून मातीने बुजवून घ्यावे.
लागवडीनंतरचे नियोजन - - लागवडीनंतर 40-45 दिवसांनी आणि त्यानंतर सात दिवसांच्या अंतराने असे दोन वेळा ट्रायकोग्रामा एक लाख कीटक प्रति हेक्टरी सोडावेत.
- प्रति हेक्टरी ल्युसी ल्युअर असलेले 12 ते 15 कामगंध सापळे उभारावेत. दर 15 दिवसांनी त्यामधील ल्युअर बदलावा.
- शेंडे व फळ पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव झाल्यास वेळोवेळी किडलेले शेंडे अळीसह कापून खोल खड्ड्यात गाडावेत.
- शेंडे किडण्याचे प्रमाण 10 टक्क्यांपेक्षा जास्त असल्यास पाच टक्के निंबोळी अर्काची पहिली फवारणी लागवडीनंतर 45 दिवसांनी करावी.
- दुसरी फवारणी लागवडीनंतर 60 दिवसांनी बीटी जिवाणू 10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून करावी.
- तिसरी फवारणी 75 दिवसांनी 15 मि.लि. डायक्लोरव्हॉस प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
- फळे तोडण्याच्या वेळी किडलेली फळे वेगळी करून खोल खड्ड्यात गाडावीत.
- चौथी फवारणी लागवडीनंतर 90 दिवसांनी 10 ग्रॅम बीटी जिवाणू किंवा चार मि.लि. स्पिनोसॅड प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून करावी.
- रसशोषक किडींचा प्रादुर्भाव आढळल्यास 20 ते 40 ग्रॅम व्हर्टिसीलियम किंवा पाच मि.लि. इमिडॅक्लोप्रिड प्रति 10 लिटर पाण्यातून आलटून पालटून फवारावे. - पिवळ्या चिकट सापळ्यांचा उपयोगसुद्धा रसशोषक किडींच्या नियंत्रणासाठी फायदेशीर ठरतो.
शरद दळवे - 9975970888
(लेखक कृषी महाविद्यालय, बारामती येथे कार्यरत आहेत.)

Monday, April 22, 2013
लक्षात घ्या ऊसवाढीच्या अवस्था
उसापासून अपेक्षित उत्पादन मिळण्यासाठी ऊसवाढीच्या निरनिराळ्या अवस्थांचे शरीरक्रियाशास्त्र समजून घेणे महत्त्वाचे आहे. त्यानुसार पीक व्यवस्थापनाचा अवलंब करावा. ऊसवाढीच्या अवस्था या आनुवंशिकता, शरीरक्रियाशास्त्रीय तथा जीवरासायनिक क्रिया आणि निरनिराळी संप्रेरके व विशिष्ट विकरे त्यांच्या नियंत्रण खाली असतात. त्यासाठी शिफारशीत हंगामनिहाय जातींची लागवड करावी.
डॉ. आर. एम. गारकर, के. एम. गवारी, पी. पी. खंडागळे
1) उगवण - उसाच्या उगवणीसाठी 28 ते 33 अंश सेल्सिअस तापमान योग्य असते. तापमान कमी झाल्यास उसाच्या उगवणीवर अनिष्ट परिणाम होऊन उगवणक्षमता कमी होते. या अवस्थेचा कालावधी एक ते दीड महिन्यांचा असतो (30 ते 45 दिवस). ऊस लागवड केल्यानंतर कांडीचा जमीन, हवा, पाणी, अन्नद्रव्ये यांच्याशी संपर्क येतो. त्यामुळे जीवरासायनिक क्रिया व विकरांच्या माध्यमातून कांडीतील सुक्रोजचे रूपांतर ग्लुकोजमध्ये होण्यास सुरवात होते. तसेच पाणी व विद्राव्य नत्र यांची उपलब्धता वाढते. पेऱ्याजवळील मूळ प्रेषक गाठीपासून कांडी मुळांची वाढ सुरू होते; तर खवल्यांनी आच्छादित डोळ्यापासून खोडाची वाढ सुरू होते. खोडाची वाढ होत असताना तळाकडील कांड्यापासून खोड मुळांची वाढ सुरू होते. तथापि, खोडमुळे कार्यक्षम होईपर्यंत कांडी मुळांचे कार्य महत्त्वाचे असते. उगवण पूर्ण होईपर्यंत जमिनीत ओलावा असणे महत्त्वाचे आहे. म्हणून पाणी कमी प्रमाणात कमी अंतराने द्यावे.
फुटवे - फुटव्यांचे प्रमाण हा ऊस जातीचा आनुवंशिक गुणधर्म असला तरी वातावरणातील घटकांचाही परिणाम होतो. फुटव्यांच्या वाढीसाठी 20 अंश सेल्सिअससाठी तापमान आवश्यक असते. तापमान 35 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त आणि 10 अंश सेल्सिअस पेक्षा कमी असेल तर फुटव्याच्या वाढीवर अनिष्ट परिणाम होतो. साधारणतः ही अवस्था दीड ते दोन महिन्यांची असते. या अवस्थेमध्ये नवीन मुळे, पाने व खोडांची वाढ सतत होत राहते. खोडाच्या नळाकडील भागात चकतीसारख्या कांड्याची वाढ होते. प्रत्येक कांडीस एक पान व एक डोळा असतो. याच डोळ्यापासून फुटवे फुटतात. या अवस्थेमध्ये भरपूर सूर्यप्रकाश खेळती हवा असणे गरजेचे असते. या कालावधीमध्ये नत्राचा दुसरा हप्ता (40 टक्के नत्र) देणे आवश्यक आहे.
पूर्ववाढ -
पूर्ववाढीची अवस्था सर्वसाधारणपणे दीड ते दोन महिने असते. या अवस्थेत पानांची लांबी, रुंदी, हरित द्रव्यांचे प्रमाण प्रकाश संश्लेषण क्रिया हरित पर्ण व जमीन यांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर तसेच मुळांची वाढ व पाणी, अन्नद्रव्ये शोषण वहनक्षमता वाढते. त्यापुढील जोमदार अवस्था किंवा ------मुख्य वाढीची पूर्वतयारी होते. या काळात नत्राची तिसरी (10 टक्के) मात्रा द्यावी.
मुख्य वाढ - तापमान 21 ते 28 अंश सेल्सिअस आणि आर्द्रता 90 टक्के असेल तर उसाची वाढ जोमदार होते. ही अवस्था हंगामनिहाय सर्वसाधारणपणे तीन ते आठ महिने असते. साधारणतः ऑक्टोबरपर्यंत ही जोमदार वाढीची अवस्था असते. त्यानंतर कमी होणाऱ्या तापमानामुळे जोमदार वाढीचा वेग कमी होत जातो. या अवस्थेमध्ये प्रकाश संश्लेषण क्रियेद्वारा सेंद्रिय कर्बोदकांची (पिष्टमय/ शर्करा) अन्नपदार्थांची निर्मिती व साठवण जोमदारपणे चालते. त्यामुळे नवीन पाने, कांड्या येणे व कांड्यांची संख्या, वजन, लांबी, रुंदी वाढणे, उसाची उंची, जाडी व वजन वाढते या क्रिया वेगाने होतात. यासाठी या कालावधीत भरपूर सूर्यप्रकाश, उष्ण हवामान आणि पाण्याचे नियोजन व्यवस्थित असावे लागते. या अवस्थेत ऊस लागणीनंतर साधारणपणे साडेचार ते पाच महिन्यांनी उसाची पक्की बांधणी 40 टक्के नत्र आणि उर्वरित 50 टक्के स्फुरद व पालाश मात्रा देऊन करावी.
पक्वता - उसाच्या जोमदार वाढीच्या अवस्थेनंतर म्हणजेच ऑक्टोबरनंतर तापमान जसजसे 15 अंश ते 20 अंश सेल्सिअसपेक्षा कमी होत जाईल, तसतसे थंडीचे प्रमाण वाढते. तेच हवामान ऊस पक्वतेस पोषक ठरते. ही अवस्था तीन ते चार महिन्यांची असते. उसाची पाने पिवळी होत जातात. त्यामुळे साहजिकच प्रकाश संश्लेषण क्रिया मंदावते. इतर रासायनिक व जीवरासायनिक क्रियांचा वेग वाढतो. उदा. ग्लुकोजचे रूपांतर सुक्रोजमध्ये होऊन रसातील साखरेचे प्रमाण रसाची शुद्धताही वाढते. रसातील नत्र- स्फुरदाचे प्रमाण कमी होते, साखरेची साठवण आणि उतारा वाढत राहतो. तसेच दिवसाच्या आणि रात्रीच्या तापमानामध्ये जास्त तफावत असेल, तर पक्वता लवकर येते. थंड हवामानाचा कालावधी जितका जास्त तितका साखर उताराही (टक्के) वाढतो.
तुरा येणे -
उसाची वाढ पूर्ण झाल्यानंतर विशिष्ट पोषक हवामानामध्ये उसाला तुरा येतो; परंतु यामध्ये उसाची जात, जमीन प्रकार, भौगोलिक स्थान, पाऊसमान, मशागत तंत्र, खत, पाणी व तण व्यवस्थापन, हंगाम इ. गोष्टी व प्रामुख्याने हवामान या घटकाचा प्रभाव महत्त्वाचा असतो. साधारणतः तापमान 20 अंश ते 25 अंश सेल्सिअस हवेतील आर्द्रता 65 ते 90 टक्के, दिवसमान (प्रकाश कालावधी) 12.5 तास व रात्रीचा कालावधी 11.5 तास प्रकाश तीव्रता 10,000 ते 12,000 फूट कॅण्डल्स अशी परिस्थिती उसामध्ये फुलकळी तयार होऊन तुरा येण्यास पोषक ठरते. अशा पोषक अनुकूल हवामान उसाच्या शेंड्यातील कायिकपणे वाढणाऱ्या अग्रकोंबाचे रूपांतर फुलकळीत होते व नंतर साधारण सात ते 10 आठवड्यांनी तुरा बाहेर पडतो. तुरा आल्यानंतर उसाची कायिक वाढ पूर्णपणे थांबते, उसाची पक्वताही वाढत जाते. तुरा आल्यानंतर साधारणपणे दोन ते 2.5 महिन्यांत उसाची तोडणी झाली नाही, तर उसाला पांगशा फुटणे, दशी पडणे, वजन घटणे व साखर उतारा कमी होणे अशा प्रकारचे नुकसान होते. उसाचे वजन व साखर उतारा टिकवून ठेवणे हा ऊस जातीचा आनुवंशिक गुणधर्म आहे.
1) उगवण चांगली होण्यासाठी महत्त्वाचे घटक -
अ) जमिनीची योग्य प्रत, ब) चांगल्या प्रकारची पूर्वमशागत, क) उत्तम दर्जाचे निरोगी बेणे, ड) सेंद्रिय तसेच रासायनिक खतांची हंगामनिहाय शिफारशीत मात्रा (10 टक्के नत्र, तसेच 50 टक्के स्फुरद व पालाश).
2) उगवणीचे प्रतिकूल भौतिक घटक ः
अ) जास्त वयाचे ऊस बेणे, ब) कीड व रोगग्रस्त बियाणे वापर, क) जास्त खोलवर लागण, ड) अतिरिक्त पाण्याचा वापर, इ) काडीवरील डोळ्यांची अयोग्य स्थिती, ई) प्रतिकूल हवामान, उ) सेंद्रिय व रासायनिक खतांचा असंतुलित वापर, ऊ) हंगामनिहाय जातींची लागवड न करणे.
ऊस पीकवाढीच्या अवस्था - उगवण -
* साधारण 1.5 ते दोन महिने कालावधी.
* कांडीतील सुक्रोजचे रूपांतर ग्लुकोजमध्ये होण्यास सुरवात.
* पाणी व विद्राव्य नत्र याची उपलब्धता वाढते.
* कांडी मुळांची वाढ सुरू होते.
* खोडाची वाढ खवल्यांनी आच्छादित डोळ्यापासून सुरू होते.
* तळकांड्यापासून खोड मुळांची वाढ सुरू होते.
फुटवे -
* साधारणपणे 1.5 ते दोन महिने कालावधी.
* खोड, पाने व मुळांची वाढ होत राहते.
* चकतीसारख्या कांड्याची वाढ होते.
* कांडीच्या डोळ्यापासून फुटवे फुटतात.
पूर्ववाढ -
* सर्वसाधारण 1.5 ते दोन महिने कालावधी.
* पानाची लांबी व रुंदी वाढते.
* हरित द्रव्याचे प्रमाण व प्रकाश संश्लेषण क्षमता वाढते.
* हरित पर्ण व जमीन याच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर वाढते.
* मुळांची वाढ व अन्नद्रव्य शोषण क्षमता वाढते.
जोमदार किंवा मुख्य वाढ - * साधारण हंगामानुसार चार ते आठ महिने कालावधी.
* प्रकाश संश्लेषण क्रियेद्वारा कर्बोदकाची निर्मिती व साठवण जोमदारपणे चालते.
* नवीन पाने व नवीन कांड्या येणे वेगाने सुरू होते.
* कांड्याची संख्या, वजन, लांबी- रुंदी वाढते.
* उसाची उंची, जाडी व वजन वाढते.
पक्वता -
* साधारण हंगामानुसार चार ते आठ महिने कालावधी.
* हवामानात उसाच्या पक्वतेस सुरवात.
* साधारण 15 ते 20 अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमानास पक्वतेस सुरवात होते.
* प्रकाश संश्लेषण क्रिया मंदावते.
* ग्लुकोजचे सुक्रोजमध्ये रूपांतर वाढते.
* रसातील नत्र व स्फुरद यांचे प्रमाण वाढून उसातील साखरेचा उतारा वाढतो.
टीप - ऊस जातींचे आनुवंशिक गुणधर्म आणि हंगाम/ हवामान यानुसार यामध्ये विशिष्ट बदल होतात.
संपर्क - 02169- 265337, 265333

बटाटा लागवडीची योग्य वेळ साधा...
बटाटा लागवड १५ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करावी, त्यासाठी शिफारशीत जातींची निवड, योग्य खत व्यवस्थापन, तसेच वेळेत पाणीपुरवठा याकडे लक्ष द्यावे. योग्य वेळी लागवड केल्यास अपेक्षित उत्पादन मिळण्यास मदत होते.
डॉ. देवीकांत देशमुख
बटाटे चांगले पोसण्यासाठी थंड हवामान आवश्यक असते. तापमान १८ ते २१ अंश से. अनुकूल असते. दिवसाचे तापमान २० ते २५ अंश से. राहिल्यास उत्पादनवाढीस मदत होते. कमी पावसाच्या भागात बटाट्याची शेती चांगली करता येते. कंदवर्गीय बटाट्यात मॅग्नेशिअम, सोडिअम आणि पोटॅशिअम इ. खनिजे, तसेच "क' आणि "ब' ही जीवनसत्त्वे मोठ्या प्रमाणात असतात, त्यामुळे रोजच्या आहारात बटाट्याचा वापर असायला हवा.

बियाणे २.५ ते चार सें.मी. आकाराचे व २५ ते ४० ग्रॅम वजनाचे असावे. प्रति हेक्टरी २५ ते ३० क्विंटल बियाणे वापरावे. लागवडीच्या आधी आठ ते दहा दिवसांपूर्वी शीतगृहातून बेण्याचे बटाटे काढून कोंब दिसू लागेपर्यंत सावलीत पसरून ठेवावेत. उन्हात बेणे सुकण्याची शक्यता असते. बेण्याला शीतगृहात ठेवण्याअगोदर प्रक्रिया केलेली नसेल, तर बेण्यातून कोंब दिसण्याअगोदर प्रक्रिया करून घेणे आवश्यक आहे. प्रक्रिया केलेले बेणे सावलीत पसरून ठेवावे. कोंब दिसू लागताच बेणे लागवडीसाठी वापरल्यास उगवणीवर परिणाम होतो. बेणे (बटाट्याच्या फोडी) प्रक्रियेसाठी १.५ ग्रॅम कार्बेन्डाझिम प्रति लिटर पाण्यात मिसळून बियाणे बुडवून नंतर लागवड करावी.
खतांचे प्रमाण ः
जमिनीच्या पूर्वमशागतीच्या वेळी हेक्टरी २५ ते ३० टन चांगले कुजलेले शेणखत जमिनीत मिसळावे. पिकाला १००-१२० किलो नत्र, ८० किलो स्फुरद व ८०-१०० किलो पालाश प्रति हेक्टरी देणे आवश्यक आहे. त्यापैकी अर्धे नत्र, स्फुरद व पालाश लागवडीच्या वेळी द्यावे व राहिलेले अर्धे नत्र लागवडीनंतर २५ ते ३० दिवसांनी सरीत टाकून नंतर मातीची भर द्यावी.
लागवड पद्धती व वेळ ः
लागवड १५ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबरपर्यंत करावी. लागवडीसाठी ४५ ते ५० सें.मी. अंतरावर सऱ्या पाडून सरीमध्ये १५-२० सें.मी. अंतरावर व पाच-सहा सें.मी. खोलीवर लागवड करावी. ४५ १५ सें.मी. व ५० २० सें.मी. या दोन्ही अंतर पद्धती योग्य आहेत.
पाणी व्यवस्थापन ः
लागवडीनंतर पिकाला लगेच हलके पाणी द्यावे. त्यानंतर चार ते सात दिवसांनी पाणी द्यावे. पाणी देताना वरंबे २/३ पाण्यात बुडतील आणि जमीन ओलसर राहील अशा प्रकारे द्यावे.
आंतरमशागत व मातीची भर देणे ः
लागवडीनंतर २५ ते ३० दिवसांनी खुरपणी करून शेत स्वच्छ ठेवावे व राहिलेली खताची मात्रा देऊन मातीची भर द्यावी. दुसऱ्यांदा मातीची भर ५५-६० दिवसांत द्यावी.
लागवडीचा खर्च व उत्पादन ः
प्रति हेक्टरी लागवड खर्च ः सरासरी रुपये ४५ हजार ते ५० हजार
प्रति हेक्टरी उत्पादन ः सरासरी २०० क्विंटल
०२४६२ - २७०११४, २७०११५
(लेखक कृषी विज्ञान केंद्र, पोखर्णी, नांदेड येथे कार्यक्रम समन्वयक म्हणून कार्यरत आहेत.)
सुधारित जाती ः
कुफरी चंद्रमुखी ः ही उत्तर भारतातील मैदानी प्रदेशात घेण्यात येणारी प्रमुख जात आहे. या जातीचे बटाटे अंडाकृती, पांढरे व आकर्षक रंगाचे असतात. साठवणुकीत जास्त काळ टिकतात. ही जात ७० ते ७५ दिवसांत तयार होते आणि उत्पादन सरासरी २०० ते २५० क्विंटल प्रति हेक्टर मिळते.

कुफरी जवाहर ः ही जात ७५ - ८० दिवसांत तयार होते. या जातीची शिफारस पंजाब, हरियाना, उत्तर प्रदेश, गुजरात व कर्नाटक राज्यासाठी केली आहे. या जातीचे बटाटे पांढरे, अंडाकृती व मध्यम आकाराचे असतात. साठवणुकीत जास्त काळ टिकतात, तसेच करपा व बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात आढळून येतो. या जातीचे रोपटे सरळ उभे वाढत असल्यामुळे सऱ्यांद्वारे बटाट्याची काढणी सहज केली जाऊ शकते. प्रति हेक्टरी २५० ते ३१० क्विंटल उत्पादन मिळते.
कुफरी अशोका ः ही लवकर तयार होणारी जात असून, ७५ ते ८० दिवसांत तयार होते. या जातीची पूर्वी उत्तर प्रदेश, बिहार व पश्चिम बंगालच्या मैदानी प्रदेशासाठी शिफारस करण्यात आली आहे. या जातीचे रोपटे मध्यम ते उंच पसरणारे आहे. बटाटे आकाराने मोठे असतात. या जातीपासून कुफरी चंद्रमुखीपेक्षा २५ ते ३० टक्के अधिक उत्पादन मिळते.
याशिवाय कुफरी ज्योती, कुफरी लवकर, कुफरी सिंधुरी या जातीही लागवडीसाठी उत्तम आहेत.
सातत्यपूर्ण प्रयत्नांतून ऊसशेती केली फायदेशीर
बदलत्या परिस्थितीमध्ये उसाचे एकरी उत्पादन वाढणे गरजेचे आहे, त्यासाठी उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून काही शेतकरी राबत आहेत. त्यात काहीजण चांगल्या प्रकारे यशस्वी झाले आहेत. सांगली जिल्ह्यातील बावची (ता. वाळवा) येथील रामचंद्र कांबळे या शेतकऱ्याने 43 गुंठ्यांत आडसाली उसाचे 120 टन उत्पादन घेतले आहे. कोबीच्या आंतरपिकातून 50 हजारांचे उत्पन्न घेतले आहे. ऊस शेती परवडत नाही, असे म्हणाऱ्यांच्या समोर या शेतकऱ्याचा प्रयोग दिशादर्शक आहे.
सांगली जिल्हा हा उसाचा पट्टा म्हणून पश्चिम महाराष्ट्रात चांगल्या प्रकारे परिचित आहे. साखर उताऱ्यातही हा जिल्हा पिछाडीवर नाही. अर्थात, या ऊसशेतीचा दुसरा भाग असा, की सिंचनाची चांगली सोय असल्याने अतिरिक्त पाण्याच्या वापरामुळे येथील जमिनी क्षारपड होत आहेत, त्यामुळे उसाचे उत्पादन एकरी 35 ते 40 टनांपुढे जाण्याची शक्यता कमी झाली. त्यातच कृषी निविष्ठांच्या वाढत्या किमती, उसाचे दर आदी कारणांमुळे ऊसशेती परवडत नाही असे म्हटले जात असले, तरी काही जिद्दी शेतकरी उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून शेतीत राबत आहेत.
प्रयत्नात सातत्य -
जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील बावची येथील रामचंद्र कांबळे यांची चार एकर शेती आहे, विहिरीच्या माध्यमातून पाण्याची सोय आहे. ऊस उत्पादनवाढीसाठी त्यांचे गेल्या तीन वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत. त्याप्रमाणे एकरी 80, 90, 95 टनांपर्यंत उत्पादन घेण्याचा प्रयत्न त्यांनी केला. या वर्षी मात्र त्यांनी 43 गुंठ्यांत 120 टनांचे उत्पादन घेऊन एक पाऊल पुढे टाकले आहे.
या क्षेत्रात असणारे केळीचे खोडवा पीक गेल्यानंतर रोटरने खुंटाची कुट्टी करून टाकली जमिनीची नांगरट व पुन्हा रोटर मारून ती भुसभुशीत केली. सहा ट्रेलर कंपोस्ट खत विस्कटून टाकले. चार फुटांच्या समान अंतरावर सऱ्या सोडून घेतल्या. जून महिन्याच्या शेवटी, वरच्यावर दोन्ही बाजूला एक फुटाच्या समान अंतरावर फुलकोबीची रोपे लावली. आठ दिवसांनी आळवणी दिली. पुढे जुलै महिन्याच्या अखेरीस को 86032 जातीच्या उसाची एक डोळा पद्धतीने लावण केली. एका महिन्यात संपूर्ण शेतावरील उगवण पूर्ण झाली. दरम्यानच्या काळात फुलकोबीच्या वाढीसाठी व किडींचा प्रादुर्भाव रोखणसाठी पूरक कीडनाशके फवारण्यात आली. सुमारे 60 दिवसांनी फुलकोबीचे प्रत्यक्ष उत्पादन सुरू झाले. सांगली, इस्लामपूर येथील बाजारांत सौद्यातून त्याची विक्री केली. फुलकोबीच्या आंतरपिकातून खर्च वजा जाता 50 हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. आडसाली ऊस तोपर्यंत तीन महिन्यांचा झाला होता.
खत व्यवस्थापन -
ऊस उत्पादनवाढीसाठी केलेले खत व्यवस्थापन व केळी पिकाचा बेवड फायदेशीर ठरल्याचे रामचंद्र यांचे म्हणणे आहे. लावणी वेळी त्यांनी चार पोती सिंगल सुपर फॉस्फेटचा वापर केला. सुमारे 90 दिवसांनी जेठा कोंब कापून घेतला. त्या वेळी दोन बॅग युरिया व दोन बॅग पोटॅश असा डोस दिला. भरणीच्या वेळेस 12 पोती निंबोळी पेंड, 10 पोती सेंद्रिय खत, 10 किलो झिंक, 10 किलो फेरस, 10 किलो बोरॉन, दोन पोती पोटॅश, दोन पोती 10.26.26, एक पोते युरिया यांचे एकत्रित मिश्रण करून तो ढीग पंधरा दिवस तसाच ठेवला. त्यानंतर तो भरणी वेळी वापरला. सुयोग्य खत व्यवस्थापनामुळे उसाची जाडी व पेऱ्यांची संख्या वाढली. ऊस गळितास जाईपर्यंत 40 ते 45 इतकी पेऱ्यांची संख्या राहिली.
संपूर्ण क्षेत्रावर ठिबक -
रामचंद्र यांनी संपूर्ण चार एकर शेताला ठिबक सिंचन केले आहे, जमीन निचऱ्याची असल्याने वाफसा लगेच येतो, ठिबक सिंचनामुळे पिकाला योग्य प्रमाणात पाणी दिले जाते. ऊस मोठा झाला तरी ठिबकद्वारे खते देता येतात. त्याचा वाढीस मोठा फायदा होतो.
आंतरपिकांत सातत्य -
रामचंद्र यांचा ऊसशेतीमध्ये आंतरपीक घेण्याचा हातखंडा आहे. कोबी, टोमॅटो अशी पिके ते घेतात. या पिकांना फवारणीसाठीची कीडनाशके वगळता वेगळा फारसा खर्च करावा लागत नाही, असे त्यांचे मत आहे. ऊस मोठा होईपर्यंत तीन ते साडेतीन महिन्यांत आंतरपिके घेण्याचा फायदा मिळून जातो. या पिकांमधून ऊसशेतीतील खर्च कमी करता येतो. रामचंद्र यांना मुलगा प्रकाश याचीही शेतात मोठी मदत होते. शेतीतील छोटी कामे स्वतः करायची, मोठ्या कामांसाठी फक्त मजूर वापरायचे, असे तंत्र त्यांनी अवलंबिले आहे. शेतीच्या प्रगतीमधूनच त्यांनी गावात टुमदार घर उभारले आहे. चार म्हशी दावणीला आहेत. शेतीतूनच हे सारे शक्य झाल्याचे त्यांनी सांगितले.
रामचंद्र यांना ऊसशेतीत पुणे येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे माजी शास्त्रज्ञ ए. एन. साळुंखे यांनी चार वर्षांपूर्वी प्रोत्साहित केले, त्यातूनच त्यांना उत्पादनवाढीची गोडी लागली.
रामचंद्र यांना ऊसशेतीत आलेला साधारण खर्च असा -
खर्च (रुपये)
मशागत - 6000
कंपोस्ट खत - 13,745
कोबी तरू - 1200
ऊस बियाणे - 7500
ऊस लावण - 3000
भांगलण - 4000
पाणी - 4000
रासायनिक, सेंद्रिय खत - 28,000
एकूण खर्च - 67,445
कोबी पिकातून 50 हजार रु. तर ऊस पिकातून पहिल्या बिलांत दोन लाख 46 हजार रुपये उत्पन्न मिळाले. खर्च वजा जाता 2,28,455 रुपये इतके निव्वळ उत्पन्न मिळाले.
संपर्क ः रामचंद्र कांबळे - 9370051182
उसाबरोबर केळीही फायदेशीर
ऊसशेती किफायतशीर होण्याच्या दृष्टीने रामचंद्र कांबळे यांना ठिबकद्वारे पाण्याचे व्यवस्थापन अत्यंत महत्त्वाचे वाटते. त्याचबरोबर उसात आंतरपिके घेतल्याने खर्च कमी होतो. यंदा 43 गुंठ्यांत 120 टन उत्पादन घेतलेल्या कांबळे यांनी यापूर्वी केळी पीकही यशस्वी करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामध्ये पहिल्या पिकातून त्यांना एकरी 40 टनांपर्यंत, तर खोडवा पिकातून त्यांनी 35 टनांपर्यंत उत्पादन घेण्याचा प्रयत्न केला. आपल्या एकूण चार एकर शेतीमध्ये ऊस हे त्यांचे मुख्य पीक असून केळी, भाजीपाला, तसेच अन्य पिकांची विविधता जपण्याचा ते प्रयत्न करतात. रासायनिक खतांबरोबर सेंद्रिय तसेच शेणखताचा वापर करण्यावरही त्यांनी भर दिला आहे.
उसातील आंतरपिकांचे महत्त्व
उसासाठी बियाणे, खते व आंतरमशागतीसाठी केलेला खर्च आंतरपिकाच्या उत्पन्नातून निघून जातो. सुरू उसामध्ये भुईमूग, कोबी, फुलकोबी, मेथी, कोथिंबीर, कलिंगड, काकडी व कांदा ही आंतरपिके घेता येतात. द्विदल वर्गातील आंतरपिके घेतल्यास जमिनीचा पोत सुधारतो. सुरू उसाचा कालावधी 12 ते 13 महिन्यांचा असतो. लागणीचा योग्य कालावधी 15 जानेवारी ते 15 फेब्रुवारी हा आहे. उसाची लागवड केल्यानंतर पूर्ण उगवण होण्यासाठी सहा ते आठ आठवड्यांचा कालावधी लागतो. सुरवातीच्या कालावधीमध्ये उसाची वाढ हळू होत असल्यामुळे उसाच्या दोन सऱ्यांमध्ये आंतरपीक घेण्यासाठी भरपूर मोकळी जागा असते. सुरू उसामध्ये आंतरपिकाची निवड केल्यानंतर त्या आंतरपिकाच्या जमीन क्षेत्राच्या प्रमाणानुसार आंतरपिकाच्या बियाण्याचे प्रमाण ठरविणे गरजेचे आहे.
उसामध्ये आंतरपिके घ्यावयाच्या पद्धती -
1) सरी-वरंबा पद्धत (पारंपरिक पद्धत) ः जमिनीच्या प्रकारानुसार हलक्या जमिनीत 90 सें.मी., मध्यम जमिनीत 100 सें.मी. व भारी जमिनीत 120 सें.मी. अंतरावर सऱ्या - वरंबे पाडून उसाची लागण सरीमध्ये केल्यानंतर दुसरे पाणी (आंबवणी) देण्याच्या अगोदर वरंब्याच्या दोन्ही बगलेत आंतरपिकाची टोकण पद्धतीने करावी. कोबी, फुलकोबी व कांद्याची लागण रोपे लावून करावी.
2) पट्टा पद्धत ः या पद्धतीत 75 किंवा 90 सें.मी. अंतरावर सलग सऱ्या पाडून दोन सऱ्यांत ऊस लागवड करून तिसरी सरी मोकळी सोडावी. अशा प्रकारे जोडओळ लागवड करून राहिलेल्या 150 सें.मी. किंवा 180 सें.मी. पट्ट्यात आंतरपिकाची लागवड करावी. या पद्धतीत उसाच्या उत्पादनात घट येत नाही. आंतरपीक निघाल्यानंतर उसात आंतरमशागत करणे सुलभ जाते.
आंतरपिकांसाठी खतमात्रा ः उसामध्ये आंतरपिकाची लागवड केली असता आंतरपिकास त्याच्या व्यापलेल्या क्षेत्राच्या प्रमाणानुसार शिफारशीत खतमात्रा द्यावी. आंतरपिके साधारण 100 ते 110 दिवसांनंतर काढणीस येतात. आंतरपिकाची काढणी केल्यानंतर खतमात्रा देऊन उसाची बांधणी करावी.
(स्रोत - मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव, ता. फलटण, जि. सातारा)

Subscribe to:
Posts (Atom)