Sunday, January 13, 2013

जनावरांसाठी चारा नियोजन कसे करावे?

चारा पिकांचे सुधारित वाण 
पज्वारी - फुले, अमृता, रुचिरा, मालदांडी, एस.एस.जी. 59-3. 
पबाजरी - जायंट, बाजरा, राजको बाजरा. 
पमका - आफ्रिकन टॉल, मांजरी कम्पोझिट, विजय, गंगा सफेद 2. 
पओट - केन्ट, आर.ओ. 19 (फुले हरिता). 
पचवळी - श्‍वेता, ईसी 4216, बंदेल लोंबिया, यूपीसी 5286. 
पलसूणघास - आर.एल. 88, आनंद 2, आनंद 3, सिरसा 9. 
पबरसीम - वरदान, मेस्कावी, जेबी 1. 
पसंकरित नेपिअर - फुले जयवंत. 
पस्टॉयलो - हॅमटा, आर.एस. 95 
पमारवेल : मारवेल 7, मारवेल 8, मारवेल 40 

कृषी महाविद्यालय पुणे येथील तज्ज्ञ सोमनाथ माने यांनी दिलेली माहिती : जनावरांना चारा देताना एकदल चाऱ्याबरोबर द्विदल चारा पिका ंचा समावेश करणे फार गरजेचे आहे. वर्षभर हिरवा चारा मिळ विण्यासाठी हंगामानुसार पेरणी करणे गरजेचे आहे; परंतु खरीप हंगामात जास्त चारा पिकांची लागवड करणे गरजेचे आहे. खरीप हंगामात मका, ज्वारी, बाजरी, चवळी, स्टॉयलो, संकरित नेपिअर, मारवेल इत्यादी चारा पिकांची लागवड करावी. रब्बी हंगामात बरसीम, लसूणघास, मका व ओटची लागवड करावी. उन्हाळ्यात मका, ज्वारी, चवळी इत्यादींची लागवड करावी. एका पूर्ण वाढ झालेल्या गाईला 25 किलो एकदल व द्विदल चाऱ्याची व पाच किलो सुक्‍या चाऱ्याची गरज असते. हे लक्षात घेता दुभत्या गाईसाठी दहा गुंठे जमीन आवश्‍यक असते. शेतकऱ्याकडे पाच ते सहा दुभत्या गाई असतात, त्यानुसार 60 गुंठे क्षेत्रावर चारा पिकांची लागवड करणे गरजेचे आहे. एका गाईसाठी वार्षिक चारा पिकाचे नियोजन करायचे असल्यास हिरवा चारा नऊ ते दहा टन व सुका चारा दोन ते अडीच टन आवश्‍यक आहे. त्यानुसार सहा गाईंसाठी 60 गुंठे जमीन आवश्‍यक आहे. त्यातून अंदाजे 55 ते 60 टन हिरवा चारा व 20 ते 25 टन सुका चारा जनावरांना उपलब्ध होऊ शकेल. 

कोरड्या चाऱ्यासाठी ज्वारीचा वापर करावा किंवा मारवेल, संकरित ने पिअरसुद्धा योग्य प्रमाणात वाळवून घेऊ शकता. एकदल व द्विदल चारा कुट्टी करून एकत्र करून घ्यावी. संकरित नेपिअर बांधाच्या कडेने लागवड करून जास्त जमीन उपयोगात आणता येते. कोणताही चारा 50 टक्के फुलोऱ्यात असताना कापणी केल्यास जास्त अन्नघटक

नियोजन चारा पिकांचे...

सध्या अनियमित पावसामुळे पुढील काळात जनावरांसाठी सकस हिरव्या चाऱ्याचा प्रश्‍न निर्माण होण्याची शक्‍यता आहे. हे लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी सध्याच्या पावसावर जनावरांच्या संख्येनुसार काही क्षेत्रावर संकरित नेपिअर, मका, ज्वारी, स्टायलो यासारख्या चारा पिकांच्या लागवडीचे नियोजन करावे. 

संकरित नेपिअर 
बहुवार्षिक, भरपूर उत्पादन देणारे संकरित नेपिअर हे फायदेशीर चारा पीक आहे. पाण्याची सोय असल्यास उन्हाळी हंगामासाठी या पिकाची लागवड फेब्रुवारी महिन्यात करावी. या पिकाच्या लागवडीला उत्तम निचरा होणारी जमीन निवडावी. शक्‍यतो निचरा न होणाऱ्या, दलदलीच्या जमिनी या पिकाच्या लागवडीसाठी टाळाव्यात. योग्य व्यवस्थापन केल्यास या पिकाचे चांगले उत्पादन मिळते. 

संकरित नेपिअर या चाऱ्यामध्ये आठ ते नऊ टक्के प्रथिने असतात. या चारा पिकाचे यशवंत आणि फुले जयवंत (आर.बी.एन. - 13) हे सुधारित वाण आहेत. यशवंत वाणाची वैशिष्ट्ये म्हणजे कापणीनंतर जोमाने होणारी वाढ, अधिक लांबलचक भरपूर फुटवे; मऊ, लांब व रुंद पाने आणि त्यावर अल्प प्रमाणात लव ही आहेत. याचबरोबरीने फुले जयवंत हा नवीन सुधारित वाण यशवंत वाणापेक्षा 10 ते 15 टक्के जास्त उत्पादन देतो. यामध्ये ऑक्‍झिलिक आम्लाचे प्रमाण देखील यशवंत गवतापेक्षा कमी आहे, म्हणून हा वाण जनावरांच्या चाऱ्यासाठी फायदेशीर आहे. 

या पिकाच्या लागवडीला उत्तम निचरा होणारी जमीन निवडावी. शक्‍यतो निचरा न होणाऱ्या, दलदलीच्या जमिनी या पिकाच्या लागवडीसाठी टाळाव्यात. खत व पाणी व्यवस्थापन योग्य प्रमाणात दिल्यास या गवताची चांगली वाढ होते. संकरित नेपिअर गवत बहुवार्षिक व भरपूर उत्पादन देणारे असल्याने शेत तणविरहित ठेवावे. लागवडीपूर्वी उभ्या - आडव्या नांगरटी करून, कुळवाच्या दोन पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी. शेवटच्या कुळवणीच्या वेळी सात ते आठ टन चांगले कुजलेले शेणखत जमिनीत मिसळावे. ऑगस्ट महिन्यापर्यंत या गवताची लागवड करता येते. याची लागवड ठोंबे मुळासह लावून करावी. सरासरी दोन ठोंबांतील अंतर 90 x 60 सें.मी. ठेवून लागवड केल्यास आंतरमशागत करणे सुलभ जाते. लागवडीच्या वेळी माती परीक्षणानुसार 50 किलो नत्र, 50 किलो स्फुरद, 50 किलो पालाश द्यावे. त्यानंतर पीकवाढीचा जोम कायम राहण्यासाठी प्रत्येक कापणीनंतर 25 किलो नत्र द्यावे. हे बहुवार्षिक बागायती चारा पीक असल्याने तणांचा उपद्रव होतो, त्यामुळे त्याच्या उत्पादनावर विपरीत परिणाम होतो. गवताच्या सुरवातीस वाढीच्या काळात एक किंवा दोन खुरपण्या देणे आवश्‍यक आहे, त्यानंतर गरजेनुसार खुरपणी अथवा खांदणी करावी. गवताच्या भरपूर उत्पादनासाठी पाणी व्यवस्थापन हा महत्त्वाचा घटक आहे. लागवड केल्यास गवताच्या उत्तम वाढीसाठी सुरवातीचे दोन व त्यानंतर आठ ते दहा दिवसांच्या अंतराने पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. 

कापणी व उत्पादन - 
या गवताची कापणी लागवडीपासून दहा आठवड्यांनी करावी. कापणी जमिनीपासून साधारण 15 ते 20 सें.मी. उंचीवर करावी, त्यामुळे फुटवे फुटण्यास चांगली मदत होते. नंतरच्या कापण्या पीकवाढीनुसार सात ते आठ आठवड्यांनी कराव्यात. म्हणजे सकस, रुचकर, पौष्टिक व रसरशीत चारा उपलब्ध होतो. अशा प्रकारे वर्षभरात सात कापण्या घेता येतात. कापण्या वेळेत करणे आवश्‍यक आहे, अन्यथा चारा जाड व टणक होऊन पौष्टिकतेचे प्रमाण कमी होऊन, चारा कमी मिळतो. शिफारशीप्रमाणे उत्तम व्यवस्थापन केल्यास प्रति वर्षी आठ ते नऊ कापण्यांद्वारे 2500 ते 3000 क्विंटल चारा एक हेक्‍टरपासून मिळू शकतो. 

चाऱ्यासाठी मका मका लागवडीसाठी भारी ते मध्यम, काळी, पाण्याचा निचरा होणारी जमीन लागते. जमीन खोलवर नांगरून कुळवाच्या दोन-तीन पाळ्या देऊन पुरेसे शेणखत मिसळावे. पेरणी जुलै महिन्यापर्यंत पूर्ण करावी. लागवडीसाठी आफ्रिकन टॉल, मांजरी कंपोझिट, गंगा सफेद - 2, विजय यांसारख्या जातींची निवड करावी. हेक्‍टरी 75 किलो बियाणे लागते. बियाण्याची पेरणी पाभरीच्या साह्याने करावी. दोन ओळींतील अंतर 30 सें.मी. ठेवावे. पेरणीपूर्वी प्रति दहा किलो बियाण्यास 250 ग्रॅम ऍझोटोबॅक्‍टर जिवाणूसंवर्धकाची बीजप्रक्रिया करावी. माती परीक्षणानुसार पेरणीच्या वेळी प्रति हेक्‍टरी 50 किलो नत्र, 50 किलो स्फुरद आणि 50 किलो पालाश द्यावे. नंतर 30 दिवसांनी 50 किलो नत्र प्रति हेक्‍टरी द्यावे. गरजेनुसार खुरपणी, कोळपणी करावी. पाण्याचा ताण पडला तर 10-15 दिवसांच्या अंतराने पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. कापणी पीक 50-60 टक्के फुलोऱ्यात आल्यावर करावी. या पिकापासून हेक्‍टरी 600 क्विंटल हिरवा चारा मिळू शकतो. 

ज्वारी - 
लागवडीसाठी जमिनीची नांगरणी करून कुळवाच्या दोन-तीन पाळ्या द्याव्यात. पेरणी जुलैअखेरपर्यंत पूर्ण करावी. लागवडीसाठी एम.पी. चारी, निळवा, रुचिरा, पुसा चारी, फुले अमृता या जातींची निवड करावी. पेरणी तिफणीच्या साह्याने करावी. दोन ओळींतील अंतर 30 सें.मी. ठेवावे. हेक्‍टरी 40 किलो बियाणे पेरावे. पेरणीपूर्वी प्रति दहा किलो बियाण्यास 250 ग्रॅम ऍझोटोबॅक्‍टर जिवाणूसंवर्धकाची बीजप्रक्रिया करावी. पेरणीच्या वेळी हेक्‍टरी 50 किलो नत्र, 50 किलो स्फुरद आणि 40 किलो पालाश द्यावे. पेरणीनंतर एक महिन्याने 50 किलो नत्राची दुसरी मात्रा द्यावी. पिकाची पहिली कापणी पीक फुलोऱ्यात आल्यावर किंवा पेरणीनंतर 65-70 दिवसांनी करावी. पहिल्या कापणीत हेक्‍टरी 500 क्विंटल चारा उत्पादन मिळू शकते; मात्र पीक फुलोऱ्यात येण्याअगोदर जनावरास खाऊ घालू नये. ज्वारी पिकाचा मूरघास तयार करता येतो. 

स्टायलो - 
या पिकासाठी निचरा होणारी, मुरमाड, डोंगराळ जमीन चालते. याची पेरणी जुलै महिन्यापर्यंत पूर्ण करावी. लागवडीसाठी फुले क्रांती या जातीची निवड करावी. लागवडीसाठी 30 सें.मी अंतरावर काकऱ्या पाडून बी टाकावे. हेक्‍टरी दहा किलो बियाणे लागते. पेरणीपूर्वी प्रति दहा किलो बियाण्यास 250 ग्रॅम रायझोबियम जिवाणूसंवर्धन लावावे. पेरणीपूर्वी हेक्‍टरी 32 किलो स्फुरद द्यावे. प्रत्येक वर्षी जुलै महिन्यात 48 किलो स्फुरद प्रति हेक्‍टरी द्यावे. रासायनिक खतांचा वापर माती परीक्षणानुसार करावा. पहिली कापणी 75 ते 80 दिवसांनी किंवा पीक फुलोऱ्यात येण्यापूर्वी करावी. नंतर 50-60 दिवसांनी कापण्या कराव्यात. वर्षाकाठी दोन कापण्यांपासून हेक्‍टरी 250 क्विंटल चारा मिळू शकतो. 

एकाच चाऱ्याचा अतिवापर टाळा... 
पशुखाद्यामध्ये एकदल व द्विदल चारा पिकांचा समावेश असणे गरजेचे असते. एकाच प्रकारचा चारा सतत देऊ नये. हिरव्या चाऱ्याची कमतरता असते, तेव्हा शेतकरी मोठ्या प्रमाणावर उसाच्या वाढ्यांचा उपयोग चारा म्हणून करतात. उसाच्या वाढ्यांत 0.5 ते 1.5 टक्के प्रथिने, ---------05 टक्के स्निग्ध पदार्थ व 9.0 टक्के काष्ठमय तंतू असतात. वरील पोषणमूल्यांचा विचार करता वाळलेल्या एकदल चाऱ्यापेक्षा उसाच्या वाढ्यांमध्ये पोषणमूल्ये कमी असतात. उसाच्या हिरव्या वाढ्यांत हिरव्या चाऱ्यापेक्षा ऑक्‍झलेट व नायट्रेटचे प्रमाण जास्त असते. वाढे मोठ्या प्रमाणात खाऊ घातल्यामुळे ऑक्‍झलेटचा शरीरातील कॅल्शिअमशी संयोग होऊन कॅल्शिअम ऑक्‍झलेट तयार होते आणि ते लघवीवाटे बाहेर पडते, त्यामुळे शरीरातील कॅल्शिअमचे प्रमाण कमी होऊन मूत्राशयावर अनिष्ट परिणाम होतो; तसेच गर्भपात, हाडे ठिसूळ होणे, जनावर माजावर न येणे व उत्पादन कमी होणे, तसेच वासरे कमकुवत होणे इ. अडचणी निर्माण होऊ शकतात, त्यासाठी जनावरांना आठ ते दहा किलो वाढे व त्याबरोबर सकस हिरवा द्विदल चारा दहा किलो यांचे मिश्रण करून द्यावे, त्याचबरोबर एक ते दीड किलो अंबोण व 25 ते 30 ग्रॅम क्षार खनिजे द्यावीत.

संकरित नेपिअर गवताची लागवड कशी करावी?

बहुवार्षिक, भरपूर उत्पादन देणारे संकरित नेपिअर हे फायदेशीर चारा पीक आहे. या पिकाच्या लागवडीला उत्तम निचरा होणारी जमीन निवडावी. शक्‍यतो निचरा न होणाऱ्या, दलदलीच्या जमिनी या पिकाच्या लागवडीसाठी टाळाव्यात. योग्य व्यवस्थापन केल्यास या पिकाचे चांगले उत्पादन मिळते. 
संकरित नेपिअर या चाऱ्यामध्ये आठ ते नऊ टक्के प्रथिने असतात. या चारा पिकाचे यशवंत आणि फुले जयवंत (आर.बी.एन. - 13) हे सुधारित वाण आहेत. यशवंत वाणाची वैशिष्ट्ये म्हणजे कापणीनंतर जोमाने होणारी वाढ, अधिक लांबलचक भरपूर फुटवे; मऊ, लांब व रुंद पाने आणि त्यावर अल्प प्रमाणात लव ही आहेत. याचबरोबरीने फुले जयवंत हा नवीन सुधारित वाण यशवंत वाणापेक्षा 10 ते 15 टक्के जास्त उत्पादन देतो. यामध्ये ऑक्‍झिलिक आम्लाचे प्रमाण देखील यशवंत गवतापेक्षा कमी आहे, म्हणून हा वाण जनावरांच्या चाऱ्यासाठी फायदेशीर आहे. 

या पिकाच्या लागवडीला उत्तम निचरा होणारी जमीन निवडावी. शक्‍यतो निचरा न होणाऱ्या, दलदलीच्या जमिनी या पिकाच्या लागवडीसाठी टाळाव्यात. खत व पाणी व्यवस्थापन योग्य प्रमाणात दिल्यास या गवताची चांगली वाढ होते. संकरित नेपिअर गवत बहुवार्षिक व भरपूर उत्पादन देणारे असल्याने शेत तणविरहित ठेवावे. लागवडीपूर्वी उभ्या - आडव्या नांगरटी करून, कुळवाच्या दोन पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी. शेवटच्या कुळवणीच्या वेळी सात ते आठ टन चांगले कुजलेले शेणखत जमिनीत मिसळावे. ऑगस्ट महिन्यापर्यंत या गवताची लागवड करता येते. याची लागवड ठोंबे मुळासह लावून करावी. सरासरी दोन ठोंबांतील अंतर 90 ु 60 सें.मी. ठेवून लागवड केल्यास आंतरमशागत करणे सुलभ जाते. लागवडीच्या वेळी माती परीक्षणानुसार 50 किलो नत्र, 50 किलो स्फुरद, 50 किलो पालाश द्यावे. त्यानंतर पीकवाढीचा जोम कायम राहण्यासाठी प्रत्येक कापणीनंतर 25 किलो नत्र द्यावे. हे बहुवार्षिक बागायती चारा पीक असल्याने तणांचा उपद्रव होतो, त्यामुळे त्याच्या उत्पादनावर विपरीत परिणाम होतो. गवताच्या सुरवातीस वाढीच्या काळात एक किंवा दोन खुरपण्या देणे आवश्‍यक आहे, त्यानंतर गरजेनुसार खुरपणी अथवा खांदणी करावी. गवताच्या भरपूर उत्पादनासाठी पाणी व्यवस्थापन हा महत्त्वाचा घटक आहे. लागवड केल्यास गवताच्या उत्तम वाढीसाठी सुरवातीचे दोन व त्यानंतर आठ ते दहा दिवसांच्या अंतराने पाण्याच्या पाळ्या द्याव्यात.
 
कापणी व उत्पादन 
या गवताची कापणी लागवडीपासून दहा आठवड्यांनी करावी. कापणी जमिनीपासून साधारण 15 ते 20 सें.मी. उंचीवर करावी, त्यामुळे फुटवे फुटण्यास चांगली मदत होते. नंतरच्या कापण्या पीकवाढीनुसार सात ते आठ आठवड्यांनी कराव्यात. म्हणजे सकस, रुचकर, पौष्टिक व रसरशीत चारा उपलब्ध होतो. अशा प्रकारे वर्षभरात सात कापण्या घेता येतात. कापण्या वेळेत करणे आवश्‍यक आहे, अन्यथा चारा जाड व टणक होऊन पौष्टिकतेचे प्रमाण कमी होऊन, चारा कमी मिळतो. शिफारशीप्रमाणे उत्तम व्यवस्थापन केल्यास प्रति वर्षी आठ ते नऊ कापण्यांद्वारे 2500 ते 3000 क्विंटल चारा एक हेक्‍टरपासून मिळू शकतो. 

एकाच चाऱ्याचा अतिवापर टाळा... 
पशुखाद्यामध्ये एकदल व द्विदल चारा पिकांचा समावेश असणे गरजेचे असते. एकाच प्रकारचा चारा सतत देऊ नये. हिरव्या चाऱ्याची कमतरता असते, तेव्हा शेतकरी मोठ्या प्रमाणावर उसाच्या वाढ्यांचा उपयोग चारा म्हणून करतात. उसाच्या वाढ्यांत 0.5 ते 1.5 टक्के प्रथिने, 9.0 टक्के काष्ठमय तंतू असतात. वरील पोषणमूल्यांचा विचार करता वाळलेल्या एकदल चाऱ्यापेक्षा उसाच्या वाढ्यांमध्ये पोषणमूल्ये कमी असतात. उसाच्या हिरव्या वाढ्यांत हिरव्या चाऱ्यापेक्षा ऑक्‍झलेट व नायट्रेटचे प्रमाण जास्त असते. वाढे मोठ्या प्रमाणात खाऊ घातल्यामुळे ऑक्‍झलेटचा शरीरातील कॅल्शिअमशी संयोग होऊन कॅल्शिअम ऑक्‍झलेट तयार होते आणि ते लघवीवाटे बाहेर पडते, त्यामुळे शरीरातील कॅल्शिअमचे प्रमाण कमी होऊन मूत्राशयावर अनिष्ट परिणाम होतो; तसेच गर्भपात, हाडे ठिसूळ होणे, जनावर माजावर न येणे व उत्पादन कमी होणे, तसेच वासरे कमकुवत होणे इ. अडचणी निर्माण होऊ शकतात, त्यासाठी जनावरांना आठ ते दहा किलो वाढे व त्याबरोबर सकस हिरवा द्विदल चारा दहा किलो यांचे मिश्रण करून द्यावे, त्याचबरोबर एक ते दीड किलो अंबोण व 25 ते 30 ग्रॅम क्षार खनिजे द्यावीत. 

पौष्टिक चाऱ्यासाठी - फुले जयवंत

फुले जयवंत हा संकरित नेपिअर या गवताचा बहुवार्षिक वाण आहे. याचा चारा अत्यंत पौष्टिक व पाचक आहे. पाण्याची उपलब्धता असल्यास कमी थंडीचा काळ वगळता वर्षभर केव्हाही याची लागवड करता येते. 

फुले जयवंत हा वाण सर्व प्रकारच्या जमिनीत वाढतो. चांगली वाढ व अधिक उत्पादनासाठी कसदार, मध्यम ते भारी व उत्तम निचऱ्याची जमीन निवडावी. हा वाण पाच ते आठ दरम्यान सामू असलेल्या जमिनीत येऊ शकतो. साधारणपणे 31 अंश सेल्सिअस तापमान या वाणाची वाढ उत्तम होते. तर 15 अंश सेल्सिअसच्या खाली तापमान गेल्यास त्याच्या वाढीवर विपरीत परिणाम होतो. उन्हाळा व पावसाळा हा काळ वाढीस पोषक आहे. या पिकाची पाण्याची गरज सुमारे 800 ते 100 मि.मी. इतकी आहे. 

लागवडीचे तंत्र ः 

लागवडीसाठी खोल नांगरट करावी. त्यानंतर कुळवाच्या तीन ते चार पाळ्या देऊन जमीन मऊ, भुसभुशीत आणि तणविरहित करावी. या गवताची लागवड ठोंबे (मुळासह कांड्या) लावून करावी लागते. साधारणपणे तीन महिने वाढू दिलेल्या पिकाच्या खोडाच्या जमिनीकडील भागातील तीन डोळे असणाऱ्या कांड्या काढून लावल्यास चांगल्या फुटतात. 

ठोंब 90 सें.मी अंतरावर सरीच्या बगलेत दोन डोळे जमिनीत व एक जमिनीच्यावर राहील अशा रीतीने लावावेत. दोन झाडांमध्ये साधारणपणे 60 सें.मी. अंतर ठेवावे. एक हेक्‍टर क्षेत्र लागवडीसाठी लागणाऱ्या ठोंबाची संख्या ही लागवडीचे अंतर व प्रत्येक ठिकाणी लावावयाची ठोंबाची संख्या यावर अवलंबून असते. 90 x 60 सें.मी. अंतरावर प्रत्येक ठिकाणी दोन ठोंबे लावल्यास हेक्‍टरी 37,000 ठोंबे लागतात तर एका ठिकाणी एकच ठोंब लावल्यास 18,500 ठोंबे पुरेसे होतात. पाण्याची उपलब्धता मुबलक असल्यास 15 अंश सेल्सिअसपेक्षा कमी थंडीचा काळ वगळता वर्षभर केव्हाही याची लागवड करता येते. उन्हाळ्यात फेब्रुवारी-मार्च तर पावसाळ्यात जून-ऑगस्ट या काळात लागवड केल्यास पिकांच्या वाढीसाठी योग्य असते. 

खत, पाणी व्यवस्थापन ः 
1) हेक्‍टरी 35 ते 40 टन चांगले कुजलेले शेणखत मशागतीचे वेळी जमिनीत मिसळावे. लागवडीच्या वेळी हेक्‍टरी 60 किलो नत्र अधिक उत्पादनासाठी प्रत्येक कापणीनंतर प्रति हेक्‍टरी 25 किलो नत्र रासायनिक व सेंद्रिय खते यांद्वारे आळीपाळीने द्यावे. 
2) फेब्रुवारी-मार्चमधील लागवडीच्या स्थिरतेसाठी सुरवातीस दोन व त्यानंतर दर 10 ते 15 दिवसांनी पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. पावसाळ्यात गरज असल्यास पाणी द्यावे. 
3) पिकांच्या सुरवातीच्या वाढीच्या काळात एक किंवा दोन खुरपण्या देणे आवश्‍यक आहे. त्यानंतर खुरपणी किंवा खांदणी ही कामे गरजेनुसार करावीत. प्रत्येक वर्षी उन्हाळ्याच्या अखेरीस एका ठिकाणी दोन ते तीन फुटवे ठेवून इतर जादा फुटवे काढून टाकावेत. त्यांचा नवीन लागवडीसाठी उपयोग करावा. 

कापणीचे तंत्र ः 1) या गवताची पहिली कापणी, लागवडीपासून नऊ ते 10 आठवड्यांनी म्हणजे साधारणतः 60 ते 70 दिवसांनी करावी. त्यानंतरच्या कापण्या दर सहा ते सात आठवड्यांनी (40 ते 50 दिवसांनी) कराव्यात. 
2) वर्षभरात आठ ते नऊ कापण्या सहज घेता येतात. कापणी जमिनीपासून 15 ते 20 सें.मी. अंतरावर करावी म्हणजे फुटवे फुटण्यास चांगली मदत होते. 
3) काळ्या कसदार जमिनीत लागवड केल्यास तसेच पाण्याची सोय व अन्य व्यवस्थापन उत्तम असल्यास या वाणापासून प्रति हेक्‍टरी 100 ते 150 टन हिरवा चारा प्रतिवर्षी सहा ते आठ कापण्यांद्वारे मिळू शकतो. 

वाणाची वैशिष्ट्ये ः 1) या संकरित वाणाच्या चाऱ्यात यशवंताच्या तुलनेत ऑक्‍झॅलिक आम्ल अल्प प्रमाणात (1.91 टक्के) आहेत. 
2) कापणीनंतर जोमाने वाढ होते. अधिक लांबीचे भरपूर फुटवे येतात, मऊ लंब व रुंद पाने असतात. 
3) चारा पालेदार, हिरवागार, रसदार आणि रुचकर आहे. 

Friday, January 11, 2013

अधिक उत्पादनासाठी मका लागवडीची सूत्रे

व्यापारीदृष्ट्या मका पीक फायदेशीर करायचे असेल तर लागवड ही मध्यम ते भारी, काळ्या आणि पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीतच करावी, कारण हलक्‍या जमिनीत अपेक्षित उत्पादन मिळत नाही. आपली जमीन मका पिकासाठी योग्य वा अयोग्य, निचऱ्याची आहे किंवा नाही, जमिनीत अन्नद्रव्यांचे किती प्रमाण उपलब्ध आहे हे माती परीक्षणाद्वारे समजते. तेव्हा माती परीक्षणास प्राधान्य द्यावे. मका हे पीक पाण्याला अतिशय संवेदनशील आहे. पेरणीनंतर सुरवातीच्या 20 दिवसांपर्यंतच्या कालावधीत पिकात जास्त पाणी वा दलदलीची स्थिती असल्यास कोवळी रोपे पिवळी पडून त्यांची मर होते. निचरा न होणाऱ्या दलदलीच्या जमिनीत लागवड केली तर खोडकुजवा रोगाचा प्रादुर्भाव होतो. या गोष्टी लक्षात घेता जमिनीची निवड काळजीपूर्वक करावी. मका लागवडीपूर्वी सर्वच शेतकरी शेतात शेणखत टाकतात. शेणखतामध्ये हुमणीच्या अळ्या असतात. शेतकरी 15 मेनंतर शेतात शेणखत टाकतात. या वेळी त्यातील हुमणीच्या अवस्था शेणखताबरोबर मातीत जाऊन पिकाचे नुकसान करतात. हुमणीमुळे मका पिकाचे 40 टक्‍क्‍यांपर्यंत नुकसान होऊ शकते. तेव्हा असे न करता शेणखत हे मार्चअखेर किंवा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यातच टाकायला हवे. असे केल्याने शेणखतातील हुमणीच्या अळ्या एप्रिल आणि मे महिन्याच्या 40 अंश से. पुढील तापमानात तग धरू शकत नाही. पर्यायाने त्या मरतात. हुमणीच्या प्रतिबंधासाठी शेणखत टाकण्यापूर्वी शेणखतावर क्‍लोरपायरिफॉसची फवारणी करावी. असे केल्याने हुमणीचा नायनाट होईल व हुमणी शेणखताद्वारे जमिनीत जाणार नाही. (नवी दिल्ली येथील मका संशोधन संचालनालयाच्या शिफारशीनुसार) बियाण्याचे प्रमाण ः मक्‍यासाठी हेक्‍टरी 15-20 किलो बियाणे पेरणीची शिफारस आहे. परंतु शेतकरी 18 ते 20 किलो प्रति हेक्‍टरी बियाणे वापरतात. जास्तीचे बियाणे वापरल्यामुळे भांडवली खर्च वाढतो. असे न करता बियाण्याचे प्रमाण शिफारशीप्रमाणेच वापरावे. मक्‍याच्या एकेरी संकरित वाणाची लागवड केली तर उत्पादनात दीड ते दोन पटीने वाढ होऊ शकते. वेळेतच पेरणीचे महत्त्व ः शिफारस केल्याप्रमाणे मक्‍याची पेरणी ही वेळेतच व्हायला हवी. कारण पेरणीची वेळ टळून गेल्यानंतर दिवसाला एक क्विंटल प्रति हेक्‍टरी उत्पादनात घट येते असे संशोधनात आढळले आहे. खरिपात जून ते जुलैचा दुसरा आठवडा यादरम्यान पेरणी उरकावी. पुढील बाब लक्षात घेतली तर हे गणित समजेल. मका पिकास पुंकेसर व स्त्रीकेसर ही दोन्ही फुले एकाच झाडावर येतात. पुंकेसर साधारणपणे 50 दिवसांनी येते त्याच वेळी 52 व्या दिवशी स्त्रीकेसर येण्यास सुरवात होते. पुंकेसरमधील परागकण चार ते पाच दिवस फलधारणेसाठी क्रियाशील असतात. परागकण स्त्रीकेसरावर पडल्यानंतर कणसात फलधारणा होते. पीक 60 दिवसांचे झाल्यानंतर मक्‍याच्या तुऱ्यामधील परागकण संपुष्टात येतात. म्हणजेच शिफारशीनंतर पेरणीस एक दिवस जरी उशीर केला तरी उत्पादनात हमखास घट येते. तेव्हा पेरणीच्या वेळेकडे लक्ष द्यावे. शिफारशीनुसार करावी लागवड ः खरीप हंगामात उशिरा आणि मध्यम पक्व होणाऱ्या होणाऱ्या जातींसाठी 75 सें.मी. अंतराच्या मार्करच्या साह्याने ओळी आखून 20 ते 25 सें.मी. अंतरावर दोन बिया चार ते पाच सें.मी. खोल टोकण करून बियाणे झाकून घ्यावे. तसेच लवकर तयार होणाऱ्या वाणासाठी दोन ओळींत 60 सें.मी. व दोन रोपांत 20 सें.मी. अंतर ठेवून वरील प्रमाणे टोकण करावी. सरी वरंब्यावर पेरणी करावयाची असल्यास 75 सें.मी. सरीच्या बगलेत मध्यावर एका बाजूलाच (दोन्ही बाजूला पेरणी करू नये) वाणपरत्वे अंतर ठेवून करावी. याप्रमाणे लागवड करण्याची शिफारस असताना शेतकरी अतिशय कमी अंतरावर (45 x 10 सें.मी.) लागवड करतात. त्याचा परिणाम पिकाची शाकीय वाढ खुंटते. तसेच त्याचा फुलोऱ्यावर देखील विपरीत परिणाम होतो. कणसांचा आकार आखूड होतो. त्यामुळे दाण्यांची संख्या कमी होते आणि उत्पादन घटते. तेव्हा लागवड शिफारशीनुसारच करावी. मका पिकावर पुन्हा मका पीक घेऊ नये. त्यामुळे जमिनीची प्रत खराब होते. मका + भुईमूग, मका + तूर आणि मका + चवळी या आंतरपीक पद्धतीत 6ः3 या प्रमाणात मका पीक फायदेशीर आढळून आले आहे. छोट्या मात्र महत्त्वाच्या गोष्टी ः 1) एका कणसाचे दाणे काढल्यास त्यांचे वजन साधारण 150 ग्रॅम भरायला हवे. परंतु कणसे आखूड झाल्याने एका कणसातील दाण्यांचे वजन फक्त 70-75 ग्रॅम भरते. येथेच शेतकऱ्यांचे 50 टक्के उत्पादन घटते. 2) काही शेतकरी मक्‍याची सरी वरंब्यावर पेरणी करावयाची शिफारस असताना सपाट वाफ्यात लागवड करतात. त्याचा परिणाम ज्या वेळी पाण्याचा ताण पडतो त्या वेळी संरक्षित पाणी देण्यात अडचणी येतात. तसेच पावसाचे पाणी शेतात एकसारखे झिरपत नाही. सरी वरंबा पद्धतीत पावसाचे पाणी सरीत थांबून एकसारखे झिरपते. 3) शेतकरी बळिराम नांगराने सरी पाडतात. त्या नांगरटीच्या मागे स्त्री मजुराकरवी मक्‍याचे बी फेकून पेरणी केली जात असल्याचे चित्र पहावयास मिळते. परंतु या पद्धतीत बी शिफारशीत अंतरावर पेरले जात नाही, त्यामुळे दोन झाडांतील अंतर एकसारखे राहत नाही. परिणामी हेक्‍टरी रोपांची संख्या (जी 83 हजार हवी असते) जास्त होते. पेरणीनंतर घ्यावयाची काळजी ः मका उगवणीनंतर आठ-दहा दिवसांनी एका चौफुल्यावर जोमदार एकच रोप ठेवून रोपांची विरळणी करावी. पेरणीनंतर पिकात जास्त पाणी किंवा दलदलीची स्थिती राहू देऊ नये. मका पीक पाण्याला अतिशय संवेदनशील आहे. त्यास पाण्याचा ताण पडला तर तुरा (पुंकेसर) येतो, मात्र स्त्रीकेसर येत नाही. (कोल्हापूर खरीप 2009 मध्ये घेतलेल्या प्रयोगाचे निष्कर्ष). दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मक्‍याला ऊस पिकासारखे पाणी देऊ नये. काही शेतकरी सरी तुडुंब भरून पाणी देताना दिसतात. परंतु सरी तुडुंब भरून पाणी देऊ नये. सरीच्या निम्म्या उंचीपर्यंतच पाणी द्यायला हवे. कारण जास्त पाणी दिले तर मूळ कुजण्याची प्रक्रिया सुरू होऊ शकते. मक्‍याची शाकीय वाढ जास्त होते, मात्र हे फायद्याचे नाही. शास्त्रीय दृष्टिकोनातून पिकाची वाढ ही मध्यमच असावी. यावरून एकच निष्कर्ष निघतो, की मका पिकास जास्त तसेच कमी पाणी देऊ नये. मध्यम स्वरूपाचे पाणी द्यावे. पावसाळ्यात पाऊस जास्त पडला असेल तेव्हा पिकातील पाणी बांध फोडून, चर खोदून शेताबाहेर काढावे. शक्‍यतो शेताच्या खोल भागाकडे चर काढावा. मक्‍याचा तुरा काढणे फायदेशीर ः अनेक शेतकरी मक्‍याचा तुरा काढावा का, असे विचारतात. मक्‍याचा तुरा काढल्यामुळे शास्त्रीय दृष्टिकोनातून मक्‍याच्या तुऱ्याचा ऍपिकल डॉमिनन्स संपुष्टात येतो. त्यामुळे उपलब्ध अन्नद्रव्ये कणसातील दाणे भरण्याच्या प्रक्रियेत उपयुक्त ठरतात. परिणामी कणसातील संपूर्ण दाणे भरले जातात. त्यामुळे उत्पादनवाढीमध्ये भर पडू शकते. खत व्यवस्थापन ः माती परीक्षणावरून विद्यापीठाने शिफारस केल्याप्रमाणे खतांचे नियोजन करणे सोपे होते. मका पिकासाठी शिफारस केलेली खताची मात्रा 120ः60ः40ः25 (नत्र ः स्फुरद ः पालाश ः झिंक सल्फेट) अशी आहे. ही मात्रा 180ः80ः80ः25 अशी वाढवत न्यावी. पेरणीच्या वेळी 40 किलो नत्र, 60 किलो स्फुरद, 40 किलो पालाश प्रति हेक्‍टरी मात्रा द्यावी. पेरणीवेळी रासायनिक खते पाच-सात सें.मी. खोलवर आणि जमिनीत चांगली मिसळून द्यावी. पेरणीनंतर 30 दिवसांनी 40 किलो नत्र, तसेच 40 ते 45 दिवसांनी 40 किलो नत्र प्रति हेक्‍टरी द्यावे. जमिनीत झिंकची कमतरता असल्यास हेक्‍टरी 20 ते 25 किलो झिंक सल्फेट द्यावे. उभ्या पिकात नत्र खतमात्रा (युरिया) मका ओळीपासून 10-12 सें.मी. दूर ओळीमधून द्यावी. खरिपात मका पिकाला पेरणीनंतर 30 दिवसांनी नत्र खताचा दुसरा हप्ता देताना, पाऊस असेल तेव्हा शेतात तुडुंब पाणी भरलेले असल्यास जमिनीतून खताची मात्रा देता येणे शक्‍य होत नाही. तेव्हा पिकावर दोन टक्के युरियाची फवारणी करावी. कोळपणी आवश्‍यकच ः मका पिकात एक महिन्यानंतर कोळपणी करणे आवश्‍यक असते. परंतु पाहणीत असे दिसून आले आहे, की अनेक शेतकरी मक्‍यात कोळपणी करतच नाहीत. बैल कोळप्याने कोळपणी केल्यास मका पिकातील तणांचा प्रादुर्भाव कमी होईलच, पण त्याबरोबर जमिनीतील ओलावा देखील टिकून राहण्यास मदत होईल. कोळपणीनंतर पाऊस पडला तर पावसाचे पाणी शेतात एकसारखे झिरपते.

सुधारित पद्धतीने करा मका लागवड

 मका हे उष्ण, समशीतोष्ण आणि थंड हवामानाशी समरस होणारे पीक आहे; मात्र पीकवाढीच्या कोणत्याही अवस्थेत धुके आल्यास ते या पिकास मानवत नाही. या पिकाच्या योग्य वाढीसाठी २५ ते ३० अंश से. तापमान चांगले असते; परंतु जेथे सौम्य तापमान (२० ते २५ अंश से.) आहे अशा ठिकाणी मका वर्षभर घेता येतो. ३५ अंश से.पेक्षा अधिक तापमान असल्यास उत्पादनात घट येते. परागीभवनाच्या वेळी अधिक तापमान आणि कमी आर्द्रता असल्यास त्याचा विपरीत परिणाम परागीभवन व फलधारणेवर होऊन उत्पादनात घट येते. तेव्हा या बाबींचा बारकाव्याने अभ्यास करून मक्‍याचे अधिक उत्पादन मिळण्यासाठी सुधारित पद्धतीचा अवलंब करावा. मका हे पीक विविध प्रकारच्या जमिनीत घेता येते; मात्र त्यासाठी चांगली मशागत आणि योग्य प्रमाणात खतमात्रांची आवश्‍यकता असते. लागवडीसाठी मध्यम ते भारी, खोल, रेतीयुक्त, उत्तम निचऱ्याची, अधिक सेंद्रिय पदार्थ आणि जलधारणा शक्ती असलेली जमीन निवडावी. जमिनीचा सामू ६.५ ते ७.५ दरम्यान असावा. विशेषतः नदीकाठच्या गाळाच्या जमिनीत हे पीक फार चांगले येते; परंतु अधिक आम्ल (सामू ४.५ पेक्षा कमी) आणि चोपण अगर क्षारयुक्त (सामू ८.५ पेक्षा अधिक) जमिनीत हे पीक घेऊ नये, तसेच दलदलीची जमीनसुद्धा टाळावी. पूर्वमशागत ः जमिनीची खोल (१५ ते २० सें.मी.) नांगरट करावी, कारण खोल नांगरटीमुळे उत्पादनात लक्षणीय वाढ दिसून आली आहे; तसेच पिकांची धसकटे, अवशेष, काडीकचरा इत्यादी खोल नांगरटीमुळे जमिनीत गाडल्याने जमिनीला सेंद्रिय घटक मिळतात व जमिनीचा पोत सुधारतो. कुळवाच्या दोन-तीन पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी. शेवटच्या कुळवाच्या पाळीच्या वेळी हेक्‍टरी १० ते १२ टन (२५ ते ३० गाड्या) चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत जमिनीत मिसळावे. हिरवळीचे खत जमिनीत गाडलेले असल्यास शेणखताची आवश्‍यकता नाही. सेंद्रिय खतांचा वापर महत्त्वाचा आहे.

सुधारित वाण ः
मक्‍याच्या संमिश्र व संकरित जाती या स्थानिक वाणांपेक्षा ६० ते ८० टक्के अधिक उत्पादन देतात. विविध कालावधींमध्ये पक्व होणारे मक्‍याचे संमिश्र व संकरित वाण उपलब्ध असून, पाऊसमान आणि जमिनीच्या मगदुराप्रमाणे योग्य वाणांची निवड करावी. महाराष्ट्राकरिता शिफारस केलेल्या संकरित आणि संमिश्र वाणांची माहिती तक्ता क्र. १ मध्ये दिली आहे. पेरणीची योग्य वेळ ः पेरणी २८ मे ते २० जून दरम्यान करावी. पेरणीसाठी जमिनीत पुरेसा ओलावा असावा. त्यामुळे उगवण चांगली होऊन रोपांची संख्या योग्य राहते. मध्य विदर्भ विभागात पेरणी जूनच्या शेवटच्या आठवड्यात करावी. खरिपातील पेरणीस उशीर करू नये, कारण उशीर झाल्यास खोडकिडीचा प्रादुर्भाव होतो. त्यामुळे रोपांची संख्या योग्य राहत नाही. लागवड पद्धत ः उशिरा आणि मध्यम कालावधीत पक्व होणाऱ्या जातींसाठी ७५ सें.मी. अंतरावर मार्करच्या साह्याने ओळी आखून २० ते २५ सें.मी. अंतरावर दोन बिया चार ते पाच सें.मी. खोल टोकण करून बियाणे चांगले झाकून घ्यावे, तसेच लवकर तयार होणाऱ्या जातींसाठी दोन ओळींत ६० सें.मी. व दोन रोपांत २० सें.मी. अंतर ठेवून वरीलप्रमाणे टोकण करावी. सरी - वरंब्यावर पेरणी करावयाची असल्यास सरीच्या बगलेत मध्यावर एका बाजूला जातीपरत्वे अंतर ठेवून पेरणी करावी. बियाण्याचे प्रमाण, बीजप्रक्रिया ः एक हेक्‍टर पेरणीसाठी १५-२० किलो बियाणे लागते. पेरणीपूर्वी दोन ते २.५ ग्रॅम थायरम हे बुरशीनाशक प्रति किलो बियाण्यास चोळावे म्हणजे करपा रोगाचे नियंत्रण करता येते, तसेच ऍझोटोबॅक्‍टर जिवाणू संवर्धन १५ ग्रॅम प्रति किलो बियाण्यास चोळल्यास उत्पादनात चांगली वाढ होते. रासायनिक खतमात्रा ः मका पीक जमिनीतून मोठ्या प्रमाणात अन्नद्रव्ये शोषून घेते, त्यामुळे यास "खादाड पीक' म्हटले जाते. अधिक उत्पादनासाठी पुढीलप्रमाणे संतुलित रासायनिक खतांचा पुरवठा करावा. मका पिकाला दाणे भरण्याच्या वेळेपर्यंत नत्राचा पुरवठा आवश्‍यक असतो. निचऱ्याद्वारे नत्राचा ऱ्हास होतो. म्हणून नत्र खतमात्रा विभागून द्यावी; परंतु संपूर्ण स्फुरद आणि पालाश पेरणीच्या वेळी द्यावे. सूक्ष्म अन्नद्रव्यांमध्ये झिंकची कमतरता असल्यास प्रति हेक्‍टरी २० ते २५ किलो झिंक सल्फेट पेरणीच्या वेळी द्यावे. पेरणी वेळी रासायनिक खते पाच ते सात सें.मी. खोलवर आणि जमिनीत चांगली मिसळून द्यावीत. उभ्या पिकात नत्र खताची मात्रा (युरिया) मका ओळीपासून १०-१२ सें.मी. दूर अंतरावर द्यावी. पेरणीनंतर घ्यावयाची काळजी ः अ) पक्षी राखण ः खरीप हंगामात पेरणीनंतर उगवण पाच ते सहा दिवसांत होते. पीक उगवत असताना कोवळे कोंब पक्षी उचलतात. परिणामी रोपांची संख्या कमी होऊन उत्पादन घटते. म्हणून पेरणीनंतर सुरवातीच्या १०-१२ दिवसांपर्यंत पक्ष्यांपासून संरक्षण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तसेच, पीक दुधाळ अवस्थेत असताना पक्षी कणसे फोडून दाणे खातात म्हणून अशा वेळी देखील पीक राखण आवश्‍यक असते. ब) विरळणी ः मका उगवणीनंतर आठ ते दहा दिवसांनी विरळणी करून एका चौफुल्यावर जोमदार एकच रोप ठेवून विरळणी करावी, त्यामुळे पिकाची वाढ चांगली व जोमदार होते. गरज भासल्यास पीक उगवणीनंतर त्वरित नांग्या भराव्यात. क) पिकात जास्त पाणी किंवा दलदल नसावी ः मका पेरणीनंतर सुरवातीच्या २० दिवसांपर्यंतच्या कालावधीत पिकात जास्त पाणी किंवा दलदलीची स्थिती असल्यास कोवळी रोपे पिवळी पडून मरतात. कारण मक्‍याची रोपावस्था या स्थितीस खूपच संवेदनशील आहे. म्हणून पेरणीनंतरच्या सुरवातीच्या २० दिवसांपर्यंतच्या काळात पिकात पाणी साठून राहणार नाही याची दक्षता घ्यावी. आंतरमशागत ः मका पिकाची वाढ सुरवातीच्या काळात जलद होत नाही, तसेच तणांचा मका पिकाशी अन्नद्रव्य आणि पाणी याबाबतीत स्पर्धा करण्याचा कालावधी पेरणीनंतर १५ ते ३५ दिवसांपर्यंतचा असल्याने तणांचा वरील कालावधीत बंदोबस्त केल्यास उत्पादन अधिक मिळते, तसेच संपूर्ण हंगामात पीक तणविरहित ठेवल्याने जितके उत्पादन मिळते, तितकेच उत्पादन तणांचा बंदोबस्त पेरणीनंतर १५ ते ३५ दिवसांपर्यंतच्या काळात केल्याने मिळते. म्हणून तणांच्या प्रादुर्भावानुसार एक ते दोन खुरपण्या करून ताटांना आधारासाठी माती चढवावी; परंतु खरीप हंगामात पावसामुळे भांगलणीकरिता योग्य वाफसा न मिळाल्यास तणांचा बंदोबस्त करणे फारच कठीण होते. म्हणून तज्ज्ञांच्या सल्ल्याने तणनाशकांचा वापर करावा. पेरणी संपताच वाफशावर ऍट्राझीन (५० टक्के) तणनाशक एका हेक्‍टरसाठी दोन किलो या प्रमाणात प्रति ५०० लिटर पाण्यात मिसळून समप्रमाणात जमिनीवर फवारावे. फवारणी केलेले क्षेत्र तुडवू नये. याशिवाय तणनाशक फवारणीनंतर १५-२० दिवसांपर्यंत आंतरमशागत करू नये. त्यानंतरच्या कालावधीत आवश्‍यकता वाटल्यास एखादी भांगलण करावी. पाणी व्यवस्थापन ः मक्‍याची पाने रुंद व लांब असतात. बाष्पीभवन क्रियेमुळे पानांतून अधिक पाणी बाहेर टाकले जात असल्याने या पिकास पाण्याची गरज अधिक आहे. खरीप हंगामात निश्‍चित आणि विस्तृतपणे पावसाची विखरण असणाऱ्या भागात मका जिरायतीखाली घेता येतो. पिकाच्या महत्त्वाच्या अवस्था पाण्याच्या ताणास खूपच संवेदनशील आहेत. म्हणून खरीप हंगामात पावसात खंड पडून पाण्याचा ताण पडल्यास पिकाच्या महत्त्वाच्या अवस्थेच्या काळात संरक्षित पाणी द्यावे. पिकाच्या महत्त्वाच्या अवस्थाकालावधी रोप अवस्था २५-३० दिवस पेरणीनंतर फुलोऱ्यात असताना ४०-६० दिवस पेरणीनंतर दाणे भरण्याच्या वेळी ७०-८० दिवस पेरणीनंतर वर नमूद केलेल्या पिकांच्या महत्त्वाच्या अवस्थांच्या वेळी पाण्याचा ताण पडल्यास उत्पादनात लक्षणीय घट येते. म्हणून अशा अवस्थांच्या काळात पाणी द्यावे, तसेच पीक फुलोऱ्यात आणि दाणे भरत असताना कमी अंतराने भरपूर पाणी द्यावे म्हणजे कणसे भरण्यास मदत होते. मका फुलोऱ्यात असताना जमिनीत पाण्याचे प्रमाण कमी असल्यास स्त्रीकेसर बाहेर पडण्यास उशीर झाल्यामुळे बीजधारणा कमी होऊन उत्पादन घटते. म्हणून पीक तुऱ्यावर आणि स्त्रीकेसर अवस्थेत असताना पाण्याची खूप गरज आहे. ः ०२३१ - २६०१११५ (लेखक मका सुधार प्रकल्प, कोल्हापूर येथे कार्यरत आहेत.) मक्‍यामध्ये घ्यावयाची आंतरपिके मक्‍याच्या दोन ओळींत अधिक अंतर असल्यामुळे आणि कमी पसारा असल्याने पिकाची सावली कमी पडते, त्यामुळे सूर्यप्रकाशाचा कार्यक्षमपणे वापर आणि दोन ओळींतील असलेल्या जागेत लवकर येणारी कडधान्ये (उडीद, मूग, चवळी) आणि तेलबिया (भुईमूग, सोयाबीन) ही आंतरपिके यशस्वीरीत्या घेता येऊ शकतात. मक्‍यात भुईमूग हे आंतरपीक जोडओळ किंवा सोडओळ पद्धतीने घेता येते. पेरभातामध्ये बहुतांशी शेतकरी मका हे मिश्र पीक मुख्यतः हिरवी कणसे आणि चारा यासाठी घेतात. पेरभात + मका आंतरपीक पद्धतीमुळे भात उत्पादनात लक्षणीय घट येते. तथापि, पेरभाताच्या सहा ओळींनंतर दोन रोपांत २५ सें.मी. अंतर ठेवून मका टोकण करणे (६० टक्के मका रोपसंख्या प्रति हेक्‍टर) हे इतर पेरभात + मका मिश्र पीक पद्धतीपेक्षा सरस आढळून आले आहे. मक्‍याची लवकर येणारी पंचगंगा संमिश्र ही जात ऊस व हळदीमध्ये मिश्रपीक म्हणून घेता येते; परंतु अशा आंतरपीक पद्धतीमुळे मुख्य पिकाच्या उत्पादनात घट येते. खरीप हंगामात मध्य महाराष्ट्र पठारी विभागामध्ये मका + भुईमूग, मका + तूर, मका + सोयाबीन आणि मका + चवळी या आंतरपीक पद्धतीत ६ः३ ओळी या प्रमाणात घेणे फायदेशीर आहे

चाऱ्यासाठी मका लागवड कधी करावी?

लागवडीसाठी सुपीक, कसदार व निचरायुक्त, मध्यम ते भारी जमीन या पिकाच्या वाढीसाठी आवश्‍यक आहे. लागवडीसाठी जमिनीची एक खोलवर नांगरट करून घ्यावी. नंतर कुळवाच्या दोन ते तीन पाळ्या देऊन जमीन चांगल्या प्रकारे भुसभुशीत करून व्यवस्थितरीत्या शेत तयार करून घ्यावे. ऑक्‍टोबर-नोव्हेंबर महिन्यांत लागवड करावी. 

लागवडीसाठी आफ्रिकन टॉल, मांजरी कंपोझिट, गंगा सफेद- 2, विजय या जातींची निवड करावी. पेरणी वेळेत करणे उत्पादनाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. पेरणीसाठी हेक्‍टरी 75 किलो बियाणे लागते. पेरणी पाभरीने 30 सें.मी. अंतरावर करावी. लागवडीपूर्वी दहा किलो बियाण्यास 250 ग्रॅम ऍझोटोबॅक्‍टर या जिवाणूसंवर्धकाची बीजप्रक्रिया करावी. पेरणीपूर्वी 20 ते 25 गाड्या शेणखत अथवा कंपोस्टखत जमिनीत मशागतीच्या वेळी चांगले मिसळून द्यावे. पेरणीच्या वेळी प्रति हेक्‍टरी 100 किलो नत्र, 50 किलो पालाश आणि 50 किलो स्फुरद द्यावे. पेरणीनंतर साधारणपणे एक महिन्याने नत्राचा दुसरा हप्ता हेक्‍टरी 50 किलो या प्रमाणात द्यावा. पीकवाढीच्या सुरवातीच्या काळात एक कोळपणी व एक खुरपणी करावी. पिकाची वाढ व्यवस्थितरीत्या होण्यासाठी सात ते आठ पाण्याच्या पाळ्या द्याव्या लागतात. कापणी साधारणपणे पीक 50 टक्के फुलोऱ्यात असताना करावी, म्हणजे पौष्टिक व चवदार चारा आपणाला उपलब्ध होतो. अगोदर किंवा उशिरा कापलेल्या वैरणीत सकसपणा कमी असतो. साधारणपणे योग्य व्यवस्थापनात मक्‍याचे हेक्‍टरी 550 ते 700 क्विंटल हिरव्या चाऱ्याचे उत्पादन मिळते.