Thursday, December 5, 2013

शेडनेट हाऊस उभारणीकरिता मार्गदर्शक सूचना

शेडनेट हाऊस उभारणीकरिता मार्गदर्शक सूचना
कृषी उत्पादन व उत्पादकता वाढीसाठी राष्ट्रीय फलोत्पादन अभियानामध्ये हरितगृह, शेडनेट हाऊस, प्लॅस्टिक मल्चिंग, प्लॅस्टिक टनेल, ऍन्टी बर्डनेट यांचा समावेश करण्यात आलेला आहे. केंद्र शासनाच्या राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत संरक्षित शेती या घटकामध्ये हरितगृह उभारणी, शेडनेट हाऊस यासाठी अनुदानाची क्षेत्र मर्यादा 1000 चौरसमीटर वरून 4000 चौरसमीटरपर्यंत वाढविली आहे. या घटकांसाठीच्या मार्गदर्शक सूचना खालीलप्रमाणे आहेत.
शेडनेट हाऊस उभारणी शेडनेट हाऊसचा उपयोग प्रामुख्याने हंगामी व बिगर हंगामी पिके घेण्यासाठी, उच्च मूल्यांची भाजीपाला पिके व फुलांच्या उत्पादनासाठी करण्यात येतो. शेडनेट हाऊसमध्ये आपणास तापमान, आर्द्रता व कार्बन-डाय- ऑक्‍साईडच्या प्रमाणावर काही प्रमाणात नियंत्रण ठेवता येते.

शेडनेट हाऊससाठी जागेची निवडीचे निकष - 1) लाभार्थी शेतकऱ्याच्या शेतात उंच सखल जमीन असल्यास निवड केलेल्या जागेचे सपाटीकरण करावे.
2) मोठ्या वृक्षाच्या सावलीत किंवा इमारतीच्या सावलीत किंवा इमारतीच्या आडोशाची जागा यासाठी निवडण्यात येऊ नये.
3) भरपूर सूर्यप्रकाश मिळेल अशी जागा निवडावी.
4) पाणीपुरवठ्याची सुविधा जवळपास असणे आवश्‍यक आहे.
5) पाण्याचा सामू 6 ते 7.5 च्या दरम्यान असेल व क्षारतेचे प्रमाण कमी असेल अशी जागा शक्‍यतो निवडावी.
6) जमीन पाण्याचा निचरा होणारी नसेल किंवा क्षारयुक्त असेल तर बाहेरून लाल रंगाची पाण्याचा निचरा होणारी वालुकामय माती वाफे तयार करण्यासाठी वापरावी.
7) जमीन निचरा होणारी नसेल तर शेडनेट हाऊस भोवती लहान चर काढावा, जेणेकरून पाण्याचा निचरा होईल.
8) विद्युत पुरवठ्याची सुविधा गरजेची आहे.
9) पाणथळ जागा शेडनेट हाऊससाठी निवडू नये.

शेडनेट हाऊस उभारणीसाठी तांत्रिक निकष - 1) खांबासाठी पक्का पाया घेतलेला असावा. खड्ड्याचा आकार 1 x 1 x 2 फूट असावा. त्यात मधोमध जीआयचा फाउंडेशन पाइप बसवून त्यास होल्ड फास्ट बार टाकून 1-2-4 प्रमाणात सिमेंट, वाळू, खडी घेऊन तयार केलेले सिमेंट कॉंक्रिट भरावे. खड्ड्याचा आकार साधारणतः खालीलप्रमाणे असावा.
2) शेडनेट हाऊसच्या विविध मॉडेल व आकारमानानुसार प्रामुख्याने गोलाकार (राऊंड टाइप) व सपाट (फ्लॅट टाइप) प्रकार आहेत. तसेच आराखड्याप्रमाणे बाजूची उंची व मध्यभागाची उंची ठेवण्यात यावी. शेडनेट हाऊससाठी आवश्‍यकतेनुसार 35 ते 75 टक्के सावलीची शेडनेट वापरण्यात यावी. शेडनेटचे फिटिंग ऍल्युमिनिअम चॅनेल पट्टीमध्ये स्प्रिंगच्या साहाय्याने केलेले असावे.
3) शेडनेट हाऊसमध्ये स्प्रिंकलर किंवा ड्रीप इरिगेशनची सोय केलेली असावी.
4) शेडनेट हाऊसला सर्व बाजूंनी जमिनीपासून एक मीटर उंचीपर्यंत स्कर्टिंगसाठी 150 जीएसएमच्या जीओ फॅब्रिक फिल्मचा उपयोग करण्यात यावा.
5) वर उल्लेख केल्याप्रमाणे दोन प्रकारांव्यतिरिक्त शेतकऱ्यांनी लोखंडी पाइपचा सांगाडा वापरून वेगळी प्रमाणके वापरून स्वतःच्या जबाबदारीवर शेडनेट हाऊस तयार करणार असतील व त्यास बॅंक कर्ज मंजूर करण्यास तयार असेल तर असे लोकल मॉडेलचे शेडनेट हाऊसचे मर्यादित प्रस्तावही सद्यःस्थितीत सन 2012-13 मध्ये मंजूर करण्यास हरकत नाही. तथापि, अशाप्रकारे उभारण्यात आलेल्या शेडनेट हाऊसच्या टिकाऊपणाबद्दल सर्व जबाबदारी लाभार्थींची राहील, याची नोंद घेण्यात यावी. तसेच याबाबत लाभार्थींचे रु. 100 च्या बॉंडपेपरवर नोटराईज्ड केलेले स्वतंत्र हमीपत्र घेण्यात यावे.
6) शेडनेट हाऊस उभारणीसाठी वापरण्यात येणारे साहित्य निश्‍चित केलेल्या आयएसआय/ बीआयएस मानकानुसार असावीत.

शेडनेट हाऊस उभारणीसाठी लागणाऱ्या साहित्यांचे तांत्रिक निकष -शेडनेट हाऊसच्या विविध मॉडेलनुसार व प्रकारानुसार आवश्‍यक असणाऱ्या साहित्यांचे तांत्रिक निकष पुढीलप्रमाणे आहेत. त्यानुसार लाभार्थींनी साहित्यांचा वापर शेडनेट हाऊसच्या उभारणीसाठी करावा.

शेडनेट हाऊसच्या गोलाकार व सपाट शेडनेट प्रकारासाठी सामाईक तांत्रिक निकष पुढीलप्रमाणे - 1) सर्व पाइप हे गॅल्व्हनाइज्ड आयर्नचे असावेत.
2) या पाइपची जाडी कमीत कमी दोन मि.मी. असावी.
3) पाइप वेल्डिंगऐवजी नट-बोल्टने जोडावेत.
4) पाइपला वेल्डिंगचे जोड नसावेत.
5) सपाट व स्थानिक प्रकारच्या शेडनेटची उंची मध्यभागी कमीत कमी 3.25 मी. असावी.
6) गोलाकार प्रकारच्या शेडनेटची उंची मध्यभागी कमीत कमी चार मी. असावी.

शेडनेट हाऊस उभारणीसाठी निश्‍चित केलेले खर्चाचे मापदंड (Cost Norms) : शेडनेट हाऊसच्या राउंड टाइप, फ्लॅट टाइप व लोकल मॉडेल प्रकाराच्या शेडनेट हाऊसच्या उभारणीसाठी आकारमानानुसार व विविध मॉडेल्सनुसार प्रति चौ.मी. क्षेत्रासाठी येणाऱ्या खर्चाचा तपशील/ अंदाजपत्रक पुढीलप्रमाणे आहे. त्यानुसार पुढील तक्‍त्यात दर्शविल्याप्रमाणे साहित्य खर्च, बांधकाम खर्च, मजुरी खर्च, मजुरीवरील सर्व्हिस टॅक्‍स, वाहतूक खर्च तसेच ऐच्छिक खर्च या सर्व घटक/ बाबींसाठी येणारा खर्च विचारात घेऊन एकूण प्रकल्प खर्च निश्‍चित करण्यात आलेला आहे. या मंजूर मापदंडानुसारच सदरच्या एकूण प्रकल्प खर्चाच्या 50 टक्के अनुदान देय आहे.

अनुदान मर्यादा - 1) वरीलप्रमाणे राउंड टाइप प्रकाराच्या शेडनेट हाऊससाठी कमीत कमी 500 चौ.मी. तर जास्तीत जास्त 4000 चौ.मी. क्षेत्र मर्यादेपर्यंत मंजूर मापदंडानुसार 50 टक्के अनुदान सर्व प्रकारच्या लाभार्थींना देय राहील.
2) तसेच फ्लॅट टाइप प्रकाराच्या शेडनेट हाऊससाठी कमीत कमी 1000 चौ.मी. जास्तीत जास्त 4000 चौ.मी. क्षेत्र मर्यादेपर्यंत मंजूर मापदंडानुसार 50 टक्के अनुदान सर्व प्रकारच्या लाभार्थींना देय राहील.
3) तसेच लो कॉस्ट/ लोकल मॉडेल प्रकाराच्या शेडनेट हाऊससाठी जास्तीत जास्त 1000 चौ.मी. क्षेत्र मर्यादेपर्यंतच मंजूर मापदंडानुसार 50 टक्के अनुदान सर्व प्रकारच्या लाभार्थींना देय राहील.
4) वरील मॉडेलप्रमाणे मंजूर मापदंडानुसार प्रकल्प खर्चाच्या 50 टक्के अथवा प्रत्यक्ष खर्चाच्या 50 टक्के यापैकी जे कमी असेल त्याप्रमाणे अनुदान देय राहील.
ब) शेतकऱ्यांनी जर या मॉडेलनुसारच परंतु वेगळ्या आकारमानाचे (4000 चौ.मी. क्षेत्र मर्यादेपर्यंत) शेडनेट हाऊस उभारणीचे प्रस्ताव सादर केल्यास त्यासाठी पुढीलप्रमाणे बाबनिहाय खर्चाचे मापदंड लागू राहतील. त्यानुसार एकूण खर्चाच्या 50 टक्के अनुदान देय राहील.

लाभार्थीच्या निवडीचे निकष - 1) शेतकऱ्याने योजनेअंतर्गत अर्ज करताना त्याच्या स्वतःच्या मालकीची जमीन असणे आवश्‍यक आहे. लाभधारकांनी दीर्घ मुदतीचा (किमान 10 वर्षे) दुय्यम निबंधक यांच्याकडे नोंदणीकृत केलेल्या करारानुसार भाडेपट्टी तत्त्वावर घेतलेल्या जमिनीवर शेडनेट हाऊस उभारल्यास ते या योजनेत ग्राह्य धरण्यात येईल. त्याचप्रमाणे पाणीपुरवठ्याची सुविधा व विद्युत पुरवठा असणे गरजेचे आहे.
2) शेडनेट हाऊसमध्ये लागवड करताना फुले, फळे, भाजीपाला, औषधी व सुगंधी वनस्पती, मसाला पिके यांचा समावेश असावा.
3) या योजनेअंतर्गत एका लाभार्थ्यास राउंड टाइप प्रकारासाठी कमीत कमी 500 चौ.मी. तर जास्तीत जास्त 4000 चौ.मी. क्षेत्र मर्यादेपर्यंत आणि फ्लॅट टाइप प्रकारासाठी कमीत कमी 1000 चौ.मी. तर जास्तीत जास्त 4000 चौ.मी. क्षेत्र मर्यादेपर्यंत तसेच लो कॉस्ट/ लोकल मॉडेल प्रकाराच्या शेडनेट हाऊससाठी 1000 चौ.मी. क्षेत्र मर्यादेपर्यंत फक्त एकदाच लाभ घेता येईल.
4) यापूर्वी कोणत्याही शासकीय योजनेअंतर्गत (एनएचएम/ एनएचबी/ आत्मा/ आरकेव्हीवाय/ जलसुधार प्रकल्प/ इतर) लाभ घेतला असल्यास अशा सर्व योजना मिळून प्रति लाभार्थी जास्तीत जास्त 4000 चौ.मी क्षेत्र मर्यादेपर्यंतच अनुदान देय आहे. त्यानुसार फ्लॅट टाइप व राउंड टाइप प्रकाराच्या शेडनेट हाऊससाठी प्रति लाभार्थी जास्तीत जास्त 4000 चौ.मी. क्षेत्र मर्यादेच्या अधीन राहून यापूर्वी लाभ घेतलेले क्षेत्र वगळून उर्वरित क्षेत्रासाठी या योजनेचा लाभ घेता येईल. या बाबीकरिता इतर योजनेतून शासकीय अनुदान घेतले असल्याचे/ नसल्याचे लाभार्थ्याने प्रतिज्ञापत्राद्वारे प्रमाणित करावे. तसेच संबंधित अधिकाऱ्यांनी त्याची खात्री करावी. तसेच ही बाब प्रकल्प मंजुरीसाठी सादर करताना जिल्हा अभियान समितीस अवगत करावी.
5) योजना राबविताना अनुसूचित जाती (16 टक्के), अनुसूचित जमाती (आठ टक्के), आदिवासी, महिला (30 टक्के), लहान शेतकरी इत्यादींना प्राधान्याने नियमाप्रमाणे लाभ देण्यात यावा. या बाबीखाली मागील अनुशेष असल्यास तो पूर्ण करावा. या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे.
6) लाभ घ्यावयाच्या सर्व लाभार्थ्यांनी शेडनेट हाऊस तंत्रज्ञानाबद्दल स्थानिक कृषी अधिकाऱ्यांकडून मार्गदर्शन घेऊन सदर काम करावयाचे आहे.
7) लाभार्थी शेतकऱ्यांनी शेडनेट हाऊस संदर्भातील प्रशिक्षण घेणे बंधनकारक आहे. असे प्रशिक्षण राज्यातील चारही कृषी विद्यापीठे, वनामती नागपूर, हॉट्रिकल्चर ट्रेनिंग सेंटर, तळेगाव दाभाडे, रामेती इत्यादी ठिकाणी उपलब्ध आहे. अशा प्रशिक्षणामुळे शेतकऱ्यांना याबाबतचे तांत्रिक ज्ञान अवगत होईल. सदरच्या प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र अनुदानासाठी (अंतिम हप्ता) आवश्‍यक राहील.
8) शेडनेट हाऊसचे बांधकाम करणाऱ्या कंपनी/ वितरक/ ठेकेदाराकडून लाभार्थ्याने प्रथम आराखडा व खर्चाचे अंदाजपत्रक करून घ्यावे व ते मूळ प्रतीत प्रस्तावासोबत जोडावे.
9) या योजनेअंतर्गत वैयक्तिक शेतकरी, शेतकऱ्यांच्या सहकारी संस्था, शेतकऱ्यांच्या उत्पादक कंपन्या शेतकरी समूह व बचत गट (पुरुष/ महिला) यांना लाभ घेता येईल. या व्यतिरिक्त इतरांना यांचा लाभ देय होणार नाही. तथापि या सर्वांसाठी बॅंक कर्जाची अट बंधनकारक राहील. शेडनेट हाऊसच्या उभारणीसाठी तसेच उच्च दर्जाचे लागवड साहित्य व निविष्ठांसाठी अनुदानाचे स्वतंत्र मापदंड ठरविण्यात आले आहेत. त्यानुसार प्रस्ताव सादर झाल्यानंतर संबंधित लाभार्थ्याने सदरच्या शेडनेट हाऊस उभारणी प्रकल्पासाठी बॅंकेकडून कर्ज घेतल्याची खात्री बॅंकेच्या ऍपरायझल रिपोर्टनुसार तसेच बॅंकेच्या कर्ज मंजुरीच्या पत्रानुसार करावी. या बाबींची पूर्तता करणारे प्रस्तावच मंजूर करावेत. अटी व शर्तींच्या अधीन राहून संबंधित बॅंकेकडून कर्ज मंजुरी संदर्भात दिलेली पत्रे यासाठी ग्राह्य धरण्यात येऊ नयेत. एकूण देय अनुदान रकमेएवढे तरी किमान बॅंक कर्ज मंजूर असणे अपेक्षित आहे. अन्यथा, प्रत्यक्षात बॅंक कर्जाच्या मंजूर रकमेच्या अधीन राहून अनुदान मंजूर केले जाईल.
10) शेडनेट हाऊस उभारणीचा सामुदायिकरीत्या लाभ घेता येईल. मात्र सहभागी लाभार्थ्यांनी त्यांचा हिस्सा कायदेशीररीत्या सिद्ध करावा.
11) लाभार्थींनी सादर केलेल्या शेडनेट हाऊसच्या प्रकल्प प्रस्तावाची छाननी राष्ट्रीय फलोत्पादन अभियानाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार करून त्यासोबत सादर करावयाची कागदपत्रे उदा. 7/12 व 8/अ चा उतारा, प्रकल्प अहवाल, हमीपत्र, करारनामा, खर्चाचे अंदाजपत्रक/ कोटेशन, खर्च केला असल्यास खर्चाची देयके (व्हॅट नोंदणीकृत), बॅंकेचे अर्ज मंजुरीचे पत्र व बॅंक ऍपरायझल रिपोर्ट इ. कागदपत्रे मूळ स्वरूपातच सादर करावीत. खर्चाच्या पावत्या बॅंकेमध्ये सादर केल्या असल्यास त्याची सत्यप्रत बॅंकेच्या सही-शिक्‍क्‍यासह सादर करावी. अशाप्रकारे तपासणी सूचीनुसार तसेच आनुषंगिक सर्व बाबींची पूर्तता केलेल्या परिपूर्ण प्रस्तावांना जिल्हा अभियान समितीची मान्यता घेण्याची जबाबदारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांची राहील. अपूर्ण व त्रुटीचे प्रस्ताव विचारात घेतले जाणार नाहीत.
12) लाभार्थी व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांचे सोबतचा विहित नमुन्यातील करारनामा हा रु. 100 च्या बॉंडपेपरवर नोटराईज्ड करून घ्यावा. तसेच सदरच्या करारनाम्यावर लाभार्थींच्या स्वाक्षरीबरोबरच संबंधित जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांची स्वाक्षरी अनिवार्य आहे. सदरचा मूळ प्रतीतील करारनामाच ग्राह्य धरण्यात यावा.
13) शेडनेट हाऊसचा दुरुपयोग होऊ नये म्हणून करावयाचे विहित नमुन्यातील लाभार्थीचे हमीपत्र रु. 100 च्या बॉंडपेपरवर नोटराईज्ड करून ते मूळ प्रतीतच सादर करावे.
14) मार्गदर्शक सूचनांमध्ये नमूद केल्यानुसार शेडनेट हाऊसच्या प्रकारानुसार, आकारमानानुसार व निश्‍चित केलेल्या तांत्रिक निकषांनुसार उभारणीचा खर्च देय आहे. तसेच शेडनेट हाऊसमधील उच्च दर्जाचे लागवड साहित्य व निविष्ठांसाठी खर्च देय आहे. या व्यतिरिक्त इतर बाबींसाठी अनुदान देय नाही.
15) सदरच्या शेडनेट हाऊससाठी बॅंक कर्जाची अट बंधनकारक आहे. यासाठी सर्व राष्ट्रीयीकृत बॅंका, सर्व शेड्यूल्ड बॅंका, सर्व प्रादेशिक ग्रामीण बॅंका तसेच संबंधित जिल्ह्यांच्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंका यापैकी एका बॅंकेकडून लाभार्थींनी कर्ज घेणे आवश्‍यक असून इतर बॅंकांकडून घेतलेले कर्ज अनुदान मंजुरीसाठी ग्राह्य धरण्यात येणार नाही.
16) महाराष्ट्र राज्य फलोत्पादन व औषधी वनस्पती मंडळाचे पत्र क्र. मराफऔवमं/ नि.शे./ 97/ 2012, दि. 9-1-2012 अन्वये सूचित केल्यानुसार ज्या लाभार्थींना 1000 चौ.मी. क्षेत्रापेक्षा जास्त क्षेत्रावर (4000 चौ.मी. क्षेत्र मर्यादेत) शेडनेट हाऊस उभारणीसाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी पूर्वसंमती पत्र दिले आहे. तसेच सदरच्या लाभार्थींनी सर्व अटी व शर्तीनुसार उभारलेल्या शेडनेट हाऊसच्या प्रकल्पासाठी सद्यःस्थितीत 1000 चौ.मी. क्षेत्र मर्यादेपर्यंत फ्लॅट टाइप व राउंड टाइप प्रकारच्या शेडनेट हाऊससाठी अनुक्रमे रु. 367 व रु. 272 प्रति चौ.मी. या दराने अनुदान/ अर्थसाहाय्य मंजूर केले आहे, अशा सर्व लाभार्थींना शेडनेट हाऊसच्या मॉडेलनुसार व आकारमानानुसार निश्‍चित केलेल्या प्रति चौ.मी. खर्चाच्या मंजूर मापदंडानुसार आता शेडनेट हाऊसच्या एकूण क्षेत्रासाठी अनुदान देय राहील; परंतु या एकूण देय होणाऱ्या अनुदानातून यापूर्वी अनुक्रमे रु. 367 व रु. 272 प्रति चौ.मी. दराप्रमाणे मंजूर केलेल्या/ अदा केलेल्या अनुदानाची रक्कम वजा जाता उर्वरित रक्कमच देय होईल. ही बाब यापूर्वी एकूण 1000 चौ.मी.पर्यंतच्या क्षेत्रासाठी मंजूर केलेल्या व अनुदान वितरित केलेल्या शेडनेट हाऊस प्रकल्पासाठी लागू राहणार नाही. तथापि सदरचे 1000 चौ.मी. क्षेत्र मर्यादेपर्यंतचे सुधारित दर म्हणजेच प्रपत्र क्र. 9 व 10 मध्ये नमूद केलेले दर हे या मार्गदर्शक सूचना निर्गमित झालेल्या दिनांकापासून लागू राहतील.
17) मार्गदर्शक सूचना व आवश्‍यक सर्व बाबींची पूर्तता केलेले शेडनेट हाऊसच्या उभारणीचे प्रकल्प प्रस्ताव मंजुरीचे अधिकार जिल्हा स्तरावरील जिल्हा अभियान समितीस आहेत. त्यानुसार प्रकल्प मंजुरीची कार्यवाही करण्यात यावी.

सर्वसाधारण सूचना - 1) लाभार्थी शेतकऱ्याच्या सोबतच्या विहित प्रपत्र 1 मध्ये अर्ज प्राप्त झाल्यानंतर तालुका कृषी अधिकारी हे उपविभागीय कृषी अधिकारी यांच्याद्वारा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्याकडे सादर करतील. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी लक्ष्यांकाच्या अधीन राहून प्रपत्र-2 प्रमाणे पूर्व संमती देतील व लाभार्थीला सविस्तर प्रस्ताव बॅंक कर्ज मंजुरी पत्रासहित सादर करण्याबाबत सूचित करतील.
2) लाभार्थीकडून बॅंक कर्ज मंजुरीसह सविस्तर प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर त्याची छाननी करून परिपूर्ण प्रस्ताव जिल्हा अभियान समितीच्या मंजुरीसाठी ठेवतील. मंजुरीनंतर जिल्हा स्तरावरून लाभार्थींना काम सुरू करण्याबाबत अनुमती देण्यात यावी. तसेच प्रकल्पाची उभारणी करण्यापूर्वी संबंधित तालुका कृषी अधिकारी प्रकल्प ठिकाणाची मोका तपासणी करून अहवाल सादर करतील.
3) शेडनेट हाऊसच्या उभारणीनंतर पुढील समिती शेडनेट हाऊसमधील सर्व सुविधा/ उपकरणे चालू स्थितीत असल्याची खात्री करील व त्याबाबतचे प्रमाणपत्र लाभार्थ्यास देईल. सदर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच अर्थसाहाय्य देय राहील. संबंधित उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांनीच सदरचा मोका तपासणी अहवाल त्यांच्या स्वाक्षरीने सादर करणे बंधनकारक आहे. तसेच देय होणारे अर्थसाहाय्य लाभार्थीच्या बॅंक कर्ज खात्यावर जमा करण्यात येईल.

अधिक माहितीसाठी -
संपर्क -020 25534860, 25513228
महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळ, साखर संकुल, शिवाजीनगर, पुणे-5

ऍग्रोवन चौकटी, ता. 9-3-2013 (केपी) फा.नं. - ए98795
अ) शेडनेट हाऊसच्या विविध मॉडेल, प्रकार व आकारमानानुसार उभारणीसाठी ठरविण्यात आलेले खर्चाचे मापदंड
अ. क्र.बाबॅडेलचा प्रकारएकूण क्षेत्र (चौ.मी.)-डेलनुसार शेडनेट हाऊसचा आकारएकूण प्रकल्प खर्च (रु.) प्रति चौ.मी. खर्च (रु.) (मापदंड)
1)शेडनेट हाऊस (र्ठी-पव ढूशि)छकच - ठढ - 500504 चौ.मी.18ु 28 मी.1,95,896/-389/-
छकच - ठढ - 10001008 चौ.मी.36 - 28 मी.3,66,034/-363/-
छकच - ठढ - 20002016 चौ.मी.36 - 56 मी.6,85,289/-340/-
42 - 48 मी.6,86,559/-341/-
छकच - ठढ - 30003024 चौ.मी.42 - 72 मी.10,03,131/-332/-
3072 चौ.मी.48 - 64 मी.10,18,706/-332/-
3024 चौ.मी.54 - 56 मी.10,05,684/-333/-
छकच - ठढ - 40004032 चौ.मी.48 - 84 मी.13,18,263/-327/-
4080 चौ.मी.60 -68 मी.13,35,149/-327/-
4032 चौ.मी.72 - 56 मी.13,26,016/-329/-
4056 चौ.मी.78 - 52 मी.13,37,132/-330/-
2)शेडनेट हाऊस (ऋश्ररीं ढूशि)छकच - ऋढ - 10001012 चौ.मी.22 - 46 मी.2,69,852/-267/-
छकच - ऋढ - 20002080 चौ.मी.40 - 52 मी.4,91,455/-236/-
छकच - ऋढ - 30003016 चौ.मी. 52 - 58 मी,6,81,806/-226/-
3040 चौ.मी.40 - 76 मी.6,92,369/-228/-
छकच - ऋढ - 40004000 चौ.मी.40 - 100 मी.8,93,295/-223/-
4048 चौ.मी. 46 - 88 मी.8,95,268/-221/-
4060 चौ.मी.58 - 70 मी.8,91,150/-220/-
4096 चौ.मी.64 - 64 मी.8,98,065/-219/-
3)शेडनेट हाऊसङु- उ/ ङेलरश्र चेवशश्र 1000 चौ.मी.22 - 46 मी.1,62,318/-160/-

अ. क्र.डेल व प्रकारॅडेलनुसार क्षेत्र मर्यादाप्रति चौ.मी. देय खर्च (रु.)एकूण खर्चाचे दर (रु. प्रति चौ.मी.) (मापदंड)
साहित्य खर्चबांधकाम साहित्य खर्चखर्चसर्व्हिस ट्रॅक्‍सवाहतूक खर्चऐच्छिक खर्च
1)छकच - ठढ (र्ठीेपव ढूशि) 600 चौ.मी.296104951118389/-
601 ते 1100 चौ.मी.27494951016363/-
1101 ते 2100 चौ.मी.2548495915340/-
2101 ते 3100 चौ.मी.2468495915332/-
3101 ते 4000 चौ.मी.2447485915328/-
2)छकच - ऋढ (ऋश्ररीं ढूशि)1000 ते 1100 चौ.मी.17715515712267/-
1101 ते 2100 चौ.मी.15411505711236/-
2101 ते 3100 चौ.मी.14610495611227/-
3101 ते 4000 चौ.मी.1429495610221/-

2 comments:

  1. सर,
    आपण मराठीत खूप छान माहिती दिलीत. आपली माह खूप उपयोगी आहे. धन्यवाद !

    ReplyDelete
  2. Dear Sir
    Thank for information about 7/12

    ReplyDelete